पथविक्रेतांना न्याय देण्याचे काम पथविक्रेता कायद्यात



पथविक्रेता कायदा हा रस्त्यावरील गरिब विक्रेत्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारा कायदा आहे, या कायद्याच्या माध्यमातून गरिब पथविक्रेत्यांना न्याय देण्याचे कार्य आपल्या हातून घडावे अशी अपेक्षा एडवोकेट पारोमिता गोस्वामी यांनी व्यक्त केली. त्या आज मूल, वरोरा आणि बल्लारपूर येथील निर्वाचित पथविक्रेता समिती सदस्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होत्या.




केंद्र शासनाने 2014 मध्ये पथविक्रेता कायदा मंजूर केला मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती. या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी श्रमिक एल्गारने अनेकदा आंदोलने केली. आता नगर पालिकेकडून पथविक्रेता समिती ची निवडणूक घेण्यात आली, आपल्या हक्काच्या कायद्याच्या अंमलबजावणीची सुरुवात झाली मात्र, जोपर्यंत आपले पूर्ण अधिकार आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपला लढा आपण कायम ठेवू असे आवाहन ॲड. गोस्वामी यांनी केले.

चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात आज मुल, वरोरा आणि बल्लारपूर येथील निर्वाचित पथविक्रेता समिती सदस्यांचा आज श्रमिक एल्गारचे वतीने पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला श्रमिक एल्गार चे अध्यक्ष प्रवीण चिचघरे, रासपचे विदर्भ महासचिव संजय कन्नावार, पत्रकार राजू बिट्टूर वार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पथविक्रेते रेवती इंगोले, संजय नरूले, वासिम भाई, अमित राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन विजय सिद्धावार यांनी तर आभार प्रदर्शन नंदिनी आडपवार केले.