अखेर त्या प्रचार रथाला हाकलून लावणाऱ्या सरपंचावर गुन्हा दाखल



वणी आर्णी wani arni तालुक्यात दारू व्यवसाय फोफावलेल्या बारभाई ग्रा.प चे सरपंच प्रदीप जावध यांनी त्यांच्या गावात आलेल्या भाजपाच्या प्रचार वाहनाला थांवबून लोकशाहीप्रधान देशात निवडणूक नियमाची पायमल्ली केली.प्रचाररथाचे वाहन चालक ज्ञानेश्वर जाधव यांनी पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावळी पोलीस दुर क्षेत्र तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार पोलिसांनी ५००,५०४,५०६,६४ आयपीएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  

हेही नक्की वाचा

दारुचे नाव घेताच शरद पवार गटाचे जैस्वाल भडकले

 प्रचार रथाला हाकलून लावणाऱ्या त्या गुंड प्रवृत्तीच्या संरपंचाची दादागिरी


नुकताच चंद्रपूर क्रांती ने त्या प्रचार रथाला हाकलून लावणाऱ्या संरपंच गुंडांची दादागिरी या मथळ्याखाली वृत्त लावण्यात आले होते.त्या बातमीची चांगलीच दखल घेण्यात आली.त्यानंतर त्या सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.


लोकसभा निवडणुकीच्या loksabha election रणधुमाळीला चांगलेच रंग चढले आहेत. उन्हाचा पारा चढला असताना निवडणुकीचा पाराही तितकाच उंचावला आहे. लोकशाहीत मतदानाचा अधिकार सर्वांना आहे, हे खरं आहे. मात्र, एखाद्या उमेदवाराची प्रचार वाहने आपल्या गावातून परतवून लावणे कितपत योग्य आहे?


एखाद्या गावात अनेक पक्षांचे समर्थक असतात. एखाद्या पक्षाला उघडपणे विरोध करणे हे लोकशाहीच्या मूल्यांशी विसंगत आहे. नुकतेच, बारभाई ता. वणी येथील सरपंच प्रदीप जाधव यांनी जाणूनबुजून प्रचार वाहनाला हाकलून लावून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.


सरपंच सारख्या व्यक्तीने एखाद्या पक्षाला बदनाम करण्यासाठी असे प्रयत्न करणे चुकीचे आहे. अशा कृतीमुळे गावात अराजकता आणि तणाव निर्माण होऊ शकतो. अशा कृतीमुळे लोकशाहीची मूल्ये कमकुवत होतात. अशा चुकीच्या कृतींचा विविध सरपंच संघटनानी निषेध केला आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.