घटक पक्षांचे पदाधिकारी संभ्रमावस्थेत, "चहा पेक्षा केटली गरम!"



चंद्रपूर लोकसभा क्षेत्र गोंडपिपरी ते आर्णी हे अंतर जवळपास ३०० किलोमीटर आहे. उमेदवाराला प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य नाही. उमेदवाराची दारोमदार ही आपले कार्यकर्ते व घटक पक्षाचे पदाधिकारी यांच्यावरच राहणार आहे. 13 - चंद्रपूर लोकसभा मतदार संघात राजूरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी आणि आर्णी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत असून एकूण 18 लक्ष 36 हजार 314 मतदार आहेत. यात 9 लक्ष 45 हजार 26 पुरुष मतदार, 8 लक्ष 91 हजार 240 स्त्री मतदार आणि इतर 48  जणांचा समावेश आहे


चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.खरी लढत ही महायुती आणि इंडिया आघाडी च्या उमेदवारांमध्ये होणार आहे .त्यामुळे विजयी उमेदवारांस ८ लाखाच्यावर मतदान आवश्यक असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. त्या हिशोबाने कार्यकर्ते व घटक पक्षाचे पदाधिकारी हे विजयी उमेदवाराच्या विजयाचे शिल्पकार    राहणार आहे.


Link वर click करा व वाचा.

जानकरसोबत असल्याचे भासवित वरिष्ठ राजकीय पक्षांचे नेते जनतेची करीत आहे दिशाभूल!


लोकसभेत जानकरांची वाट पाहतो,त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी परभणी करांची.. पंतप्रधान मोदींचा संदेश |


महायुतीच्या स्टार प्रचारकात सुधीर मुनगंटीवारांचे नाव


घटक पक्षातील पदाधिकारी हे तळागाळातील कार्यकर्ते असतात त्यामुळे मतदारासोबत पदाधिकाऱ्यांचे नाळ जुळलेली असते.आज  मतदार संभ्रमावस्थेत आहेत.तर घटक पक्षांचे पदाधिकारी हे निरुत्साही असल्याचे बघायला मिळत आहे.राजकिय पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व उमेदवारांनी घटक पक्षांच्या पदाधिकारी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे घटक पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळत आहे.


सध्याची परिस्थिती बघता पदाधिकारी व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह अजून संचारला नाही वातावरण निर्मिती व विजयाच्या तोऱ्यात असलेल्या उमेदवारांना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना ही बाब घातक ठरेल असे सध्या बोलल्या जात आहे. निवडणुकीची खरी रणधुमाळी अजून सुरू झाली नसून चार तारखेनंतर प्रत्येक उमेदवारांचे खऱ्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. 


घटक पक्ष गावागावातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साह संचारण्यासाठी उमेदवार निरुत्साही दिसत आहे. त्यामुळे मतदार व  स्थानिक नेते संभ्रमावस्था आहे. निर्माण झालेली स्थिती  म्हणजे  "चहा पेक्षा केटली गरम" असे व्हायला नको. यासाठी उमेदवारांनी पक्षाचे छोटे-मोठे पदाधिकारी घटक पक्षाची पुढारी यांचे सोबत चर्चा करायला हवी असे मत   मतदारांमध्ये आज व्यक्त केले जात आहे.



"चहा पेक्षा केटली गरम !" म्हणतात ते यालाच!


नुकतेच एका उमेदवारांचा कार्यालयात कार्यकर्त्या समोर स्वतः ला श्रेष्ठ समजणाऱ्या दोन स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची हाणामारी चर्चेचा विषय ठरत आहे."चहा पेक्षा केटली गरम" हे याचे जिवंत उदाहरण आहे.उमेदवारांनी अश्या अती उत्साही पदाधिकाऱ्यांवर लगाम लावावा अन्यथा उमेदवाराला उताणे पाडण्यात हेचं अती उत्साही पदाधिकारी कारणीभूत राहतील.