तालुका प्रतिनिधी:-
भद्रावती तालुक्यातील सिताराम पेठ ते मुधोली पर्यंत रोडचे काम करण्यात येत आहे. रोड डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू आहे.या रोडचे कंत्राट पी एच कन्ट्रक्शन यांना मिळाले आहे.सुरू असलेल्या नवीन कामात महीण्याभरातच खड्डे पडले आहे.त्यामुळे डांबरीकरणाचा दर्जा दिसून येत आहे.या कामाची योग्य चौकशी करून कंत्राटदारांचे परवाना रद्द करण्याची मागणी केन्द्रीय मानवाधिकार संघटनेने केले आहे
सितारामपेठ ते मुधोली 371 रामा या मध्ये काम सुरू आहे.
सदर कामात (MPM) डांबरीकरणाचे काम केलेले असून, रोडच्या दोन्ही बाजुस मुरुम टाकणे हे गरजेचे आहे. पण सदर कंत्राटदाराने मुरुम च्या ऐवजी साइडची माती खोदून त्यांनी रोडच्या दोन्ही बाजूस टाकलेली आहे. सदर कामामध्ये 40" mm च्या गिट्टी ऐवजी Over Size म्हणून 65" mm ची गिट्टी वापरण्यात आली आहे.
सदर कामामध्ये काम चालू करण्यापूर्वी Tack Code हे 0.30 Kg Sqm. मारणे गरजेचे असले तरी सदर कंत्राटदाराने डांबर ऐवढे टाकलेले नाही आहे. आणि त्याबरोबर वरच्या Coat वर 1.7Kg. Sqm. हे पण त्यांनी मारलेले नाही. सदर (MTM) डांबरीकरणाचे काम पूर्ण होऊन 1 महिना सुध्दा झालेला नसुन रस्त्यावर खंडे पडलेले आहेत. या खंड्ड्यामुळे अपघात होऊन जखमी झालेले आहेत. हे काम कंत्राटदार प्रमोद मगरे यांचे असल्यामुळे अधिकारी हे प्रमोद मगरे यांची पाठराखण करीत असल्याचे स्पष्ट दिसुन येते. त्यामुळे कामाचा दर्जा खालावलेला आहे.
सदर काम नित्कृष्ठ दर्जाचे होत असुन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. सदर कॉन्ट्राक्टर नामे प्रमोद मगरे यांनी केलेल्या आतापर्यंत केलेल्या सर्व कामाची चौकशी करण्यात यावी. सदर कामाची निविदा तात्काळ रद्द करण्यात यावी.कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावी अन्यथा केन्द्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
सदर निवेदनावर चौकशी करणे सुरू आहे.दोषी आढळल्यास कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल
या रोडच्या कामाची चौकशी करून आठ दिवसांत कार्यवाही करणार असल्याचे अभियंता माधूरी हनवते ( दोहीतले) यांनी दिले आहे.