नागभिडच्या लक्कि किराण्याला आमदारांचा आशीर्वाद? MLA's blessing to Nagbhid's Lucky Grocery?चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर व भंडारा जिल्ह्याला लागून असलेल्या नागभिड मध्ये लक्की किराणा दुकानातून दुरवर आपला सुगंधित तंबाखू व भेसळयुक्त तेलाचा व्यापार सध्या चांगलाच फोफावला आहे.त्यासाठी एका  कीर्तीवंत आमदाराचा आशीर्वाद या दुकानदारावर असल्याने हम करे सो कायदा असल्याचे दिसून येत आहे.


लक्कि किराणा दुकानदाराचे जिभेवर साखर ठेवून गोडगोड बोलून अन्न व औषध विभाग,जनप्रतिनिधी व पत्रकारांना गुमराह करण्याचा प्रयत्न करत आपला धंदा जोमात सुरू ठेवला आहे. सर्रासपणे अवैध व्यवसाय सुरू असतांना संबधीत विभाग झोपेचे सोंग घेवून आहे.


नागभिड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लक्की किराणा दुकानातून सुगंधित तंबाखू व भेसळयुक्त तेलाचा व्यवसाय केला जात आहे.भेसळयुक्त तेल किरकोळ विक्रेत्यांना विकल्या जाते आणि त्याच विक्रेत्यांच्या दुकानांवर अन्न व औषध विभागाची कार्यवाही करण्यासाठी हनीफच मदत करीत असल्याचे बोलल्या जात आहे.


आपली मोठी कार्यवाही टाळण्यासाठी हनीफच ही कार्यवाही घडवून आणत असल्याचे बोलल्या जात आहे.संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना महीण्यातून एकादी कार्यवाही अपेक्षित असते त्यासाठी हनीफच्या मदतीने हे घडवून आणल्या जाते.आणि हनीफच्या माध्यमातून कार्यवाहीची तडजोड केली जात असल्याची सुत्रांकडून माहीती आहे.