स्वप्निल काशीकर यांच्या संपत्तीची होणार चौकशी?Swapnil Kashikar's wealth will be investigated?



चंद्रपूर (वि. प्रति . )

शिवा वझरकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्निल यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, यासाठी एलसीबी ने पाऊले उचलल्याची अधिकृत माहिती आहे. असे झाल्यास एलसीबी चे ही धाडसी कारवाई म्हणून अवश्य नोंद होईल. आपल्या गुंडगिरीच्या जोरावर काशीकर यांनी अवैध संपत्ती जमा केली असल्याचे बोलले जाते आपल्या गुंडगिरीच्या भरोशावर जम बसविला होता. नुकतेच काही वर्षांपूर्वी वन विभागाच्या एका अधिकाऱ्यावर बंदूक रोखून त्याला धमकावणे, गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा रेती घाटावर जीवघेणी मारहाण केली होती, हे सर्व गैरप्रकार बघता काशीकर यांच्या संपत्तीच्या चौकशीची केलेली मागणी योग्य आहे.

शिवा वझरकर हत्येचा मुख्य सुत्रधार स्वप्नील काशीकर


आता हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे असुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी रामनगर पोलिसांकडून वर्ग करण्यात आलेल्या तपासाची सुत्रे हाती घेता क्षणीचं आरोपींचा तिन दिवसांचा पिसीआर घेवून आरोपीच्या कार्यालयातुन मोठा शस्त्रसाठा जप्त केला. त्यानंतर आणखी दोन दिवसांचा पिसीआर घेण्यात आल्यामुळे अपराध्यांचे धाबे दणाणले आहेत. महेश कोंडावार यांच्या नेतृत्वातील एलसीबी पथकाचे प्रतिभा उंचावली असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात राजकीय वरदहस्त प्राप्त अपराध्यांचे प्रस्थ या कारवाईमुळे नक्कीच कमी होईल अशी चर्चा आता होऊ लागली आहे.



गुन्हेगारी वर वचक निर्माण करण्याचे पोलीस अधीक्षक समोर आव्हान !!!




नविन पोलिस अधिक्षकांचे चंद्रपूर जिल्ह्यात आगमन झाले. शिस्तप्रिय अशी ख्याती असलेल्या नविन पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी या हत्या प्रकरणाकडे आपले लक्ष केंद्रित केले. नागपूर येथे असतांना नवीन पोलीस अधीक्षक यांनी नागपूरातील गुंडांना वठणीवर आणले आहे.त्याच्या कडून अश्या बेधडक कार्यवाही ची अपेक्षा आहे.या हत्याप्रकरणात हत्या घडल्यानंतर आरोपींनी कुणा-कुणाशी संपर्क साधला, त्यांना कुणी - कुणी मदत केली या सर्व बाबींचा तपास एलसीबी पथकाने केल्यास मोठे घबाड उडकीस येऊ शकते, अशी चर्चा आता वर्तविल्या जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्राचा साठा बाळगण्याचा काय हेतु असु शकतो? आरोपींचे कुणाशी आर्थिक लेण देण आहे काय ? या सर्व बाबींचा उलगडा कोंडावार यांच्या नेतृत्वातील एलसीबी पथक अवश्य करतील. अशी जनतेला अपेक्षा आहे. चंद्रपूरात रेती, कोळसा, क्रिकेट सट्टा, बंदी असलेला सुगंधित तंबाखु चा व्यापार मोठ्या प्रमाणात पोलिस विभागाच्या सहकार्याने सुरू आहे. या व्यवसायातुन मोठी माया जमविण्याच्या मोहाने अनेक आपराधीक प्रवृत्तीने राजकीय वशिल्याने प्रवेश केला आहे. त्या सर्व अपराधिक प्रवृत्तींवर वचक बसविण्यासाठी एलसीबी पथकाने कोणतीही हयगय न करता या प्रकरणाचा तपास करायला हवा, जेणेकरून दुसरा शिवा वझरकर अपराधी प्रवृत्तीचा बळी जाणार नाही. तुर्तास एवढीचं अपेक्षा महेश कोंडावार यांच्या नेतृत्वातील एलसीबी पथकाकडून व नविन पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनात गुन्हेगारांवर वचक बसविण्यात अवश्य मोठे पाऊल उचलले जाईल अशी आशा नागरिक बाळगत आहे.