परवानगी न घेता बांधकाम सुरू असलेल्या इमारती वरून पडल्याने मजूराचा मृत्यू !चंद्रपूर (प्रति.)
चंद्रपूर तुकूम परीसरातील सर्व्हे नंबर 98/1 प्लांट नंबर 1 मध्ये महानगरपालिकेचे कुठलेही नाहरकत प्रमाणपत्र न घेता अवैधरित्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे.बांधकाम करीत असतांनाच मजूराराचे जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंजूर खाली कोसळल्याने मजूराचा जागीच मृत्यू झाला. या मृत्युची कुठेही वाच्यता न करता प्रकरण नस्ती बध्द करण्यात आले.एका मजूराचा या अवैध बांधकामात विनाकारण जिव गेला आहे.


तुकूम परीसरात वास्तव्य करीत असलेल्या इमारतीच्या बाजूलाच नविन इमारतीचे बांधकाम सुरू आहे.कोणतेही नवीन बांधकाम करीत असतांना महानगरपालीकेची नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते.मात्र बांधकामधारकाने महानगरपालिकचे कोणतेही नाहरकत प्रमाणपत्र घेतले नाही.विना परवानगी बांधकाम सुरू आहे.बांधकाम करीत असलेल्या इमारतीच्या बाजूला लागून विज पुरवठा करणारे तार आहेत.बांधकाम सुरू असतांनाच एका मजुराचा या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने तीव्र विज प्रवाहामुळे मजूर खाली फेकल्या गेला.


मजूराच्या डोक्याला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.जिल्हा सामान्य रुग्णालयात पोस्ट मार्डम करण्यात आले.मात्र संबंधीत बांधकाम धारकांने प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून मृतकाच्या नातेवाईकांना हाताशी धरून प्रकरण थंड करण्यात आले.यासाठी महानगरपालिकेचे काही अधिकारी व पोलीसांनी संबंधित बांधकामधारकाला पाठीशी घातल्याचे सांगण्यात येत आहे.प्रकरण इतके गंभिर असतांनासुध्दा सदर घटनेचे बांधकामधारक विरोधात साधी तक्रारसुध्दा करण्यात आली नसल्याने मनपाच्या मनमानी कारभारावर नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे . एकीकडे मनपा सोशल माध्यमातून आपल्या पारदर्शक कारभाराचे गुणगान करीत असते तर दुसरीकडे अवैध, विना परवानगी बांधकाम करणाऱ्या धनाढ्यांना पाठीशी घालत असल्याचे बोलल्या जात आहे. विना परवानगीने बांधकाम करणारे आता जुन्या तारखेत परवानगी काढण्यासाठी प्रयत्न करीत असून महानगरपालिकेचे काही अधिकारी यासाठी धडपड करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे