पत्रकारिता करणे तारेवरची सर्कस, पोलीस अधीक्षक परदेशी यांचे प्रतिपादन,

चंद्रपूर :-पत्रकार हा समाजाला दिशा देण्याचं काम करतो व वृत्तपत्र हे समाजमनाचे आरसे असतात पण सद्यस्थितीत स्वतःचे कुटुंब सांभाळून पत्रकारिता करणे तारेवरची सर्कस झाली आहे असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी मराठी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकारांना संबोधित करताना केले आहे.बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील पहिले पत्रकार आहेत ज्यांनी ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्रातून देशात मराठी पत्रकारितेचे युग सुरू केले. 6 जानेवारी 1812 रोजी कोकणातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेले बाळ शास्त्री केवळ 34 वर्षांचे होते. पण त्यांचे विचार, काम करण्याची पद्धत आणि समाजात जागृती आणण्यात त्यांची भूमिका. बाळशास्त्री जांभेकर यांचे पहिले मराठी दैनिक ६ जानेवारी रोजी प्रकाशित झाले आणि हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी पत्रकार दिन चंद्रपूर शहरातील शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृहात चंद्रपूर गडचिरोली पत्रकार संपादक संघातर्फे आयोजित करण्यात आला, यावेळी मंच्यावर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक हितवाद चे जिल्हा प्रतिनिधी मजहर अली, मनसे जिल्हा उपाध्यक्ष तथा संपादक राजू कुकडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ महासचिव तथा संपादक संजय कन्नावार संपादक कुमार जुनमलवार संपादक रकिब शेख, शेखर तावाडे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे औचित्य साधून चंद्रपूर गडचिरोली पत्रकार संपादक संघांचे संजय कन्नावार, कुमार जुनमलवार, रकिब शेख, शेखर तावाडे यांनी काही खेळाडू व पत्रकारांचा सत्कार आयोजित केला होता यावेळी पुण्याच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मेडल जिंकणाऱ्या लावण्या सुभाष नागरकर व आतापर्यंत सातवे वेळा कबड्डीत पुरस्कार प्राप्त करणारी अश्विनी बावणे या मुलीचा सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमाला राजू बिट्टूरवार, अनुप यादव, दिनेश एकवनकर,नरेश निकुरे, विठ्ठल आवळे,राजू महासाहेब,तुळशीराम जांभुळकर, आदींनी परिश्रम घेतले, सुत्रसंचलन तावाडे राष्ट्रपाल रामटेके यांनी केले तर आभार प्रदर्शन रकिब शेख यांनी केले. या कार्यक्रमात चंद्रपूर क्रांतीचे संपादक तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ महासचिव संजय कन्नावार यांचा जन्मदिनानिमित्त पत्रकार संघाच्या वतीने व राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.