क्रांतीवीर संगोळी रायन्ना राज्याभिषेक सोहळा नंदगड येथे होणार संपन्न
आद्य स्वातंत्रवीर, स्वराज्य नायक, राष्ट्रविर संगोळी रायन्ना यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी  राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने नंदगड ता.खानापुर जि.बेळगाव (कर्नाटक) येथे २६ जानेवारी रोजी करण्यात येते.राष्ट्रनायक माजी कॅबिनेट मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेव जानकर साहेब यांच्या संकल्पनेतून गेल्या १५ वर्षांपासून हा सोहळा साजरा केला जात आहे.आद्य स्वातंत्रवीर स्वराज्य नायक राष्ट्रविर संगोळी रायन्ना यांचे कार्य जगाला कळावे हा त्यांचा मानस असून संगोळी रायन्ना यांनी केलेले कार्य हिंदुस्थान च्या जनतेच्या ह्रदयात कोरण्याचे काम जानकर करीत आहेत.
यावर्षी सुध्दा आद्य स्वातंत्रवीर स्वराज्य नायक राष्ट्रविर संगोळी रायन्ना यांचा १६ वा राज्याभिषेक वार्षिकोत्सव शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी  सकाळी ९ वा. राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने आयोजित करण्यात आले आहे.या राज्याभिषेक वार्षिकोत्सवाचे मुख्य अतिथी मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आमदार राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब हे राहणार आहेत.या सोहळ्याचे अध्यक्ष मा. सिदप्पा अक्कीसागर राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय समाज एम्प्लाईज फेडरेशन हे राहणार आहेत.यात मा.शिवलिंगप्पा किन्नूर, राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष,मा.धर्मप्पा तोंटापूर प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक ,मा.सुनिल किन्नूर प्रदेश प्रभारी राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक,मा.काशीनाथ (नाना) शेवते, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र,ज्ञानेश्वर माऊली सलगर मुख्य महासचिव राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र व इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थिती राहणार आहे.या सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने राष्ट्रीय समाज उपस्थित रहावे असे आवाहन संजय कन्नावार महासचिव विदर्भ प्रदेश यांनी केले आहे.