दाट वस्ती मध्ये शुरू असलेल्या अवैध स्विट मार्ट फॅक्टरी वर प्रदुषण विभागाची धाड




चंद्रपूर बल्लारपूर बायपास रोडवर असलेल्या शिवमंदिर आणि व्हीआयपी मोटर्सच्या मागे स्वीट मार्टचा कारखाना बेकायदेशीरपणे चालवला जात आहे. या कारखान्याच्या आजूबाजूला दाट वस्ती व शाळा, मंदिरे व इतर सामाजिक व धार्मिक स्थळे आहेत.या स्वीट मार्ट मध्यून निघणाऱ्या दुर्गंधीयुक्त हवेमुळे नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमाकांत यादव यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाला निवेदन देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली होती.त्यानुसार प्रदुषण नियंत्रण मंडळाने सदर कारखान्यावर कार्यवाही केल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचा दणका बसला आहे.


बायपास रोडवर असलेल्या गौरव मंडळाव्दारे स्वीट मार्ट व बेकरी चालविण्यात येते. या स्वीट मार्ट व बेकरीच्या आत मध्ये एक खोल खड्डा खोदण्यात आले आहे.त्या खड्ड्यात स्वीट मार्ट व बेकरी मधील दुषित झालेले सांडपाणी त्या ठिकाणी जमा करून ठेवल्या जाते.ते दुषित सांडपाणी जमीनीत मुरविल्या जाते.त्यामुळे परिसरातील नागरिकांना तेच दुषित झालेले पाणी प्यावे लागत आहे.
या परिसरातील शाळकरी मुले, मंदिर, चर्चमध्ये पूजा करण्यासाठी येणारे भाविक आणि लग्न व विश्रांतीसाठी लोकांची सतत वर्दळ असते. या कारखान्यातून हवेत वेळोवेळी दुर्गंधी येत असते. हे खूप घातक आहे. या दुर्गंधीमुळे परीसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत,



परीसरातील राहणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या हवेतील दुर्गंधीमुळे कधीही जीवितहानी होऊ शकते. ज्यामध्ये अशा रासायनिक दुर्गंधीमुळे शिशू व नवजात मुलांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.त्यामुळे हे अवैध चालणारै कारखाने आधीच बंद झाले पाहिजेत. गौरव मंडळाच्या या बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या स्वीट मार्ट कारखान्याला टाळे ठोकून दंडात्मक कारवाई करण्यात यावी. या कारखान्यातून निघणाऱ्या दुर्गंधीमुळे काही अपघात किंवा जीवितहानी झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील. 


हा बेकायदेशीर कारखाना वेळीच बंद न केल्यास राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आंदोलन सुरू करण्यात येणार असून याबाबतचे निवेदन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमाकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले होते.त्यानुसार प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेत सदर कारखान्यावर कार्यवाही करण्यात आली आहे.