चंद्रपूर (का.प्र.)
महाराष्ट्र शासनाच्या महाविकास आघाडी सरकार ने कोरोना काळामध्ये शासनमान्य यादीत समाविष्ट नसलेल्या स्थानिक वर्तमानपत्रांना मिळणाऱ्या "दर्शनी जाहिराती" आकस्मिकरित्या बंद केल्या. वर्तमानपत्र प्रकाशित करताना स्थानिक पत्रकारांना- संपादकांना अनेक समस्यांशी सामोरे जावे लागते.
ऐन कोरोना काळात आकस्मिकपणे तत्कालीन राज्य सरकारने शासनमान्य यादीत समाविष्ट नसलेल्या स्थानिक वर्तमानपत्राच्या दर्शनी जाहिराती बंद करण्याच्या निर्णय घेतला. त्या दर्शनी जाहिराती पुर्ववत सुरू करण्यात याव्यात. तसेचं शासनमान्य जाहिरात यादीवर असलेल्या स्थानिक वर्तमानपत्रांना मिळणाऱ्या शासनाच्या जाहिरातीत सुद्धा भेदभाव करण्यात येत आहे.
दैनिक वर्तमानपत्रांना मिळणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या जाहिराती या १६०० सेमी तर साप्ताहिक वर्तमानपत्रांना त्याच जाहिराती या ४०० से.मी. च्या दिल्या जातात, साप्ताहिक वर्तमानपत्रांवरील हा भेदभाव दूर करण्यात येऊन समान आकाराच्या जाहिराती वितरित करण्यात याव्या. तसेचं यावर्षी १ आगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी, दिपावली-२०२३ व १४ ऑक्टोबर ला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दरवर्षी देण्यात येणाऱ्या.
शासनाच्या नियमित जाहिरातीपासुन साप्ताहिक वर्तमानपत्रांना वगळण्यात आले व दैनिक वर्तमानपत्रांना त्या मोठ्या आकाराच्या प्रसिद्ध करण्यात येतात. हा छोट्या वर्तमानपत्रांवरील अन्याय दुर करावा, अशी मागणी विदर्भ राज्य ग्रामीण व शहरी पत्रकार संघातर्फे राज्याचे अभ्यासु मंत्री नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार
वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय,
तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा) यांना देण्यात आले. यावेळी विदर्भ आठवडी चे संपादक राजु बिट्टूरवार, पब्लिक पंचनामा चे संपादक विजय सिद्धावार व चंद्रपूर क्रांती चे संपादक संजय कन्नावार उपस्थित होते.