तुकुम परीसरातील डॉ. राहूल मधूकर लोधे व त्यांच्या पत्नी नामे सौ. सुषमा राहुल लोधे यांच्या नावे असलेल्या मौजा दे.गो. रैय्यतवारी सर्व्हे नं. ९८/२ प्लॉट नं. व ९ मध्ये बांधकाम मंजूरी प्रमाणे बांधकाम करण्यात आलेले नसून बांधकाम नियम अटी शर्तीचे पालन केलेले नसल्याने तात्काळ बांधकाम थांबविण्याची मागणी केन्द्रीय मानवाधिकार संघटनेने केली आहे.
शासनाच्या जी. आर. परीपत्रकाप्रमाणे महानगरपालीका हद्दीत हॉस्पीटल (दवाखाना) बांधकामाकरीता कमीत कमी १० हजार स्के. फुट जमिन असल्याशिवाय हॉस्पीटल बांधण्यास मंजूरी देता येत नाही.
परंतू राहूल लोधे यांनी बांधकाम मंजूरी घेतांना कागदोपत्री बांधकामास मंजूरी मिळेल या पध्दतीने बिल्डींग प्लॅन तयार करून महानगरपालीका बांधकाम विभाग मधून आर्थिक (साटेलोटे) करुन बांधकामाला आरंभ मंजूरी घेतली असून ज्या ठिकाणी बांधकाम होत आहे त्याच ठिकाणी बांधकाम हॉस्पीटलच्या ओ.पि.पि. व पेशंटला अॅडमिट करण्याच्या सुविधेनुसार बांधकाम होत असल्याने, त्याचे बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे व झालेले बांधकाम तात्काळ पाडण्यात यावे. अन्यथा केन्द्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे म.न.पा. समोर धरणे निर्दशने व ठिय्या आंदोलन करण्यात येईल याला आपण स्वतः जबाबदार राहील असे निवेदनाद्वारे केली आहे.