मुंबई:- राष्ट्रीय समाजाचे थोर विचारवंत डाॅ.प्रा.हरी नरके Dr. Prof. Hari Narke, a great thinker of the national societyयांचे क्रांती दिनी आणि जागतिक आदिवासी दिनी आज दिनांक. ९ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी १० वाजता मुंबईमधील सायन हाॅस्पीटल मध्ये दुखःद निधन झाले.त्याच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेवराव जानकर यांनी सायन हाॅस्पीटल मध्ये जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी वैकुंठ स्मशानभूमी, पुणे येथे सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेमध्ये ठेवण्यात येणार आहे. अंत्यविधीसुद्धा वैकुंठ स्मशानभूमी पुणे मध्येच होणार आहे.
राष्ट्रनायक आमदार महादेवराव जानकर साहेब यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शुक्रवार दिनांक ११ आॅगस्ट रोजी सकाळी १० वा. आपआपल्या भागात राष्ट्रीय समाजाचे थोर विचारवंत प्रा.हरि नरके यांना पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्याचे आदेश काशीनाथ (नाना) शेवते- प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र ज्ञानेश्वर (माऊली) सलगर- मुख्य महासचिव महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.