२३ ऑगस्टला डॉ ए पी जे अब्दुल कलाम निसर्ग उद्यानात मोफत प्रवेशFree entry to Dr APJ Abdul Kalam Nature Park on 23rd August




चंद्रपूर:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमा Nectar Festival of Freedom Program च्या समारोपीय उपक्रमांतर्गत बुधवार दि.२३.०८.२०२३ रोजी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम निसर्ग उद्यान, बल्लारपूर रोड, चंद्रपूर Bharat Ratna Dr. A. P. J. Abdul Kalam Nature Park, Ballarpur Road, Chandrapur येथे कोनशिला अनावरण सोहळा व अमृत रोपवाटिका (वृक्षारोपन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्यानं दि. २३.०८.२०१३ रोजी निसर्ग उद्यानात निःशुल्क प्रवेश राहणार असुन होशी पर्यटकांनी या संधीचा व आयोजीत कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वनविकास महामंडळाच्या चंद्रपूर वनप्रकल्प Chandrapur Forest Project of Forest Development Corporation विभागाचे विभागीय व्यवस्थापक श्री. एस. वाय. मरस्कोले यांनी केले आहे.


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे 'मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश" अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर, जिल्हा परिषद, चंद्रपूर व चंद्रपूर शहर महानगर पालिका, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२३.०८.२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता वनविकास महामंडळाच्या चंद्रपूर वनप्रकल्प विभाग अंतर्गत येत असलेल्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम निसर्ग उद्यान, बल्लारपूर रोड, चंद्रपूर येथे कोनशिला अनावरण सोहळा व अमृत रोपवाटिका (वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय, म. रा. तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन दि.२३.०८.२०१३ रोजी भारतरल डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम निसर्ग उद्यान, बल्लारपूर रोड, चंद्रपूर येथे हौशी पर्यटकांना निःशुल्क प्रवेश दिला जाणार आहे. तेव्हा पर्यटकांनी या दिवशी निसर्ग उद्यानात मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या संधीचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वनविकास महामंडळाच्या चंद्रपूर वनप्रकल्प विभागाचे विभागीय व्यवस्थापक श्री. एस. वाय. मरस्कोले यांनी केले आहे.