लाॅन, मंगल कार्यालयांचे प्रदुषण अनियंत्रित !LAN, Mangal Offices Pollution Uncontrolled



लग्नाच्या रेशीमगाठी स्वर्गातच बांधल्या जातात, असे म्हटले जाते. सर्वांत पवित्र बंधन म्हणून याकडे पाहिले जाते. पूर्वी विवाह समारंभ दिमाखदार न करता घरासमोर अंगणात किंवा मंदिरात साधेपणाने करण्याची पद्धत होती. पण, आता हौसेच्या नावाखाली पैशाची उधळपट्टीही केली जाते. सध्या मंगल कार्यालयांचा खर्च लाखोंची मर्यादा ओलांडत आहे. मात्र हे लॉन्स, मंगल कार्यालय महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे रितसर परवानगी न घेता सुरु असल्याचे दिसून येत आहे.

शहर आणि आजूबाजूच्या परिसरात लॉन्स आणि मंगल कार्यालये फोफावली आहेत. परंतु, या अनधिकृत लॉन्स आणि मंगल कार्यालयांमुळे रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी होत असल्याचेही चित्र आहे. त्यामुळे नियमावलीत लॉन्स आणि मंगल कार्यालयांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून, त्यात अनेक बंधने घालण्यात आली आहेत.

प्रदूषण मंडळाने २४ नोव्हेंबर २०१६ रोजी लग्न कार्यालये व लाॅन्स या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार लग्नासाठीचे खुले मंडप, लाॅन्स यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी घेतल्याशिवाय व्यवसाय कुठेही सुरू करू नये, असे हरित न्यायाधिकरणाने आता स्पष्ट केले आहे.  मात्र जिल्ह्यातील फक्त श्री.साई गजानन इंटरप्राइसेस (ताडाळी) एम आय डी सी चंद्रपूर,जयश्री मिडास बामडेली भद्रावती,मे.त्रिस्टार इन प्रा.ली.मारोती शोरुम जवळ वडगाव चंद्रपूर,राॅयल ब्लू रिसार्ट इंडीया प्रा.ली.मौजा चैती तुकूम ता.चिमूर यांनी रितसर परवानगी घेतली आहे. जिल्हयात हजारो लाॅन,मंगल कार्यालये, रिस्टार्ट यांनी कुठलेही परवानगी न घेता जनतेच्या जिवाशी खेळ खेळत आहे. 

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना परवानगी देण्यासाठी किंवा चौकशी करण्यासाठी जराही वेळ नाही.ज्या लाॅन,मंगल कार्यालये,रिसार्ट, रेस्टॉरंट यांनी परवानगी घेतली नाही त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे पाच जिल्ह्यांचा प्रभार असल्याने त्यांना वेळच नाही. 

चंद्रपूर जिल्ह्यात मागील तिन महीण्यापासून अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे.त्यामुळे प्रदुषीत असलेला चंद्रपूर जिल्हा सध्या रामभरोसे आहे. गेल्या पाच वर्षांत परवानगी न घेणाऱ्या या लाॅन धारकावर कारवाई करण्याचे धाडस अधिकाऱ्यामध्ये नसल्याचे दिसून येत आहे.

 महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या डोळ्यासमोर दिसत असतांनाही डोळ्यांवर पट्टी बांधून आर्थिक प्रलोभनास बळी पडले.जिल्हयातील कुठल्याही परवानगी नसलेल्या लाॅन, रिसार्ट ,मंगल कार्यालये, रेस्टॉरंट यांची कधीही तपासणी सुध्दा केलेली नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.लाॅन, रिसार्ट,मंगल कार्यालय, रेस्टॉरंट मध्ये होत असलेला प्रदुषण  कार्यालयातील पेटीत दाबल्या जात आहे.या शुभ कार्यालयांची लाॅन, मंगल कार्यालय, रेस्टॉरंट,रिसार्ट धारक एका कार्याचे लाखो रुपये घेतात .मात्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची साधी परवानगी न घेता खुले आम चालवीत असतात त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे.मात्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जागेवरुनच चौकशी करून फाईल बंद करतात.