राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८वी जयंती यंदा प्रथमच नवी दिल्लीत साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मा.मंत्री आमदार महादेव जानकर यांनी केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा खरा परिचय देशपातळीवर करून देण्याच्या उद्देशाने जयंती कार्यक्रमाचे नवी दिल्लीतील श्री सत्य साई ऑडोटोरियम येथे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेत्या पंकजा मुंडे असणार आहेत.या वेळी राज्यसभेचे खासदार पी. विल्सन, आग्रा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रबल प्रताप सिंह, शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. विश्वनाथ, तेलंगणा विधान परिषद सदस्य येगे मल्लेश्याम, गुजरातचे माजी खा. सागर राईका, रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, रासपचे प्रभारी रामकुमार पाल, रासपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शिवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर आदी उपस्थित राहणार आहेत.
अहिल्यादेवी होळकर जयंती प्रथमच नवी दिल्ली येथे असल्याने अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर देशाच्या राजधानीत घुमणार आहे. यशवंत सेनेच्या माध्यमातून प्रथम चौंडी येथे जयंती साजरी करून नंतर मुंबई व आता दिल्ली येथे साजरी होणार असल्याचेही जानकर यांनी केले आहे यांनी सांगितले आहे.