ताडाळी येथे शिवजन्मोत्सव शोभायात्रा Shiv Janmatsava procession at Tadaliरयतेचे राजे, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार १० मार्च २०२३ रोजी ताडाळी येथे शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून “ ब्रम्हास्त्र ढोल ताशा पथक “ चंद्रपूर यांच्या पारंपारिक गजरात शिवजयंतीचा कार्यक्रम करण्यात आले.शिवजयंती निमीत्त ताडाळी गावामध्ये मिरवणूक काढून शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा सजवून शोभा यात्रा काढण्यात आली .या कार्यक्रमाचे सौ. संगीता अशोक पारखी (सरपंच ग्रा.पं. ताडाळी) , श्री. संजोग उद्धव अडबाले ( ग्रा.पं.सदस्य ) , डॉ. रमेश वऱ्हाटे , जेष्ठ नागरिक राजू पा. दिवसे, अशोक पारखी, महादेव डेरकर, अमित पारखी, प्रविण वऱ्हाटे, यांचे नेतृत्वात शिवजयंती शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी सर्वस्वी हेमराज जुनघरे, हर्शल तिवाडे, शुभम चौधरी, हेमंत झाडे, मोरेश्वर ढवळे, कवडू दिवसे, प्रकाश चिकराम, शुभम असेकर, राजू आमटे, किशोर आखरे, संदीप समर्थ, सचिन वरारकर, ईश्वर आखरे, दीपक निखाडे, सौरभ उगे,व इतर सहकारी समस्त ग्रामवासी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.