राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आजपासुन विदर्भ दौऱ्यावर State president of Rashtriya Samaj Party on Vidarbha tour from today


विदर्भातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीबाबत राष्ट्रीय समाज पक्षाची Rashtriya Samaj Party  रणनीती ठरवून पक्ष बांधणी मजबूत करून  विदर्भातील सर्व जिल्ह्यातील रासप कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करण्याकरीता रासपचे प्रदेश अध्यक्ष काशिनाथ (नाना) शेवते यांचे खंबीर नेतृत्वात  व   प्रमुख मार्गदर्शनात शुक्रवार दिनांक  24 फेब्रुवारी2023 पासून ते 01 मार्च 2023पर्यंत  विदर्भातील  पूर्व नियोजित जिल्हास्तरीय आढावा  बैठका  आयोजित केल्या  आहेत .


 त्यानुसार आज अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी ३ वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला मार्गदर्शन करण्याकरीता रासपचे  प्रदेश अध्यक्ष काशिनाथ (नाना) शेवते  यांच्या समवेत प्रदेश मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली )सलगर, विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रा. एड.रमेश पिसे,  विदर्भ प्रदेश  संपर्क प्रमुख कृषी सम्राट राजेंद्र पाटील, विदर्भ प्रदेश मुख्य महासचिव संजय कन्नावार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  या बैठकीला विदर्भातील सर्व  जिल्ह्यातील रासप  कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विदर्भ  प्रदेशाध्यक्ष प्रा. ऍड. रमेश पिसे यांनी केले आहे. अशी माहिती  विदर्भ प्रदेश सचिव रामदास माहुरे यांनी दिली. विदर्भस्तरीय पूर्व. नियोजित दौरा शुक्रवार दिनांक 24फेब्रुवारी 2023 सकाळी 11:00 वा. बुलढाणा तर सायंकाळी 4:00 वा. अकोला. शनिवार दिनांक 25फेब्रुवारी 2023 ला सकाळी 11:00 वा. वाशीम तर सायंकाळी 4:00 वा. अमरावती.रविवार दिनांक 26फेब्रुवारी 2023ला सकाळी  11:00वा. नागपूर   सोमवार दिनांक 27फेब्रुवारी 2023ला सकाळी 11:00वा वर्धा  तर सायं 4:00 वा यवतमाळ मंगळवार दिनांक 28फेब्रुवारी 2023ला सकाळी 11:00 वा चंद्रपूर तर सायंकाळी 4:00 वा गडचिरोली बुधवार दिनांक 1मार्च 2023ला सकाळी 11:00 वा. गोंदिया तर सायं 4:00 वा भंडारा येथे बैठका आयोजित करण्यात आले आहेत.