करोडची कामे एकाच कंत्राटदाराला Crore works to a single contractorमूल (प्रतिनिधी) : जिल्हा निधी आणि जनसुविधा योजने District Fund and Jan Suvidha Yojanaअंतर्गत जवळपास 1 कोटी 27 लाख रूपये किंमतीचे सुमारे 45 कामे एकाच कंत्राटदाराला मंजुर केले असुन हे संपुर्ण कामे ऑफलाईन निवीदा Offline bidding पद्धतीने काढण्यात आली होती, यातील एका निवीदेतील 23 कामे अंदाजपत्रकाच्या 0.10 कमी दराने तर दुसऱ्या निवीदा प्रक्रियेतील 22 कामे हे अंदाजपत्रकीय किंमतीनुसार मंजुर  करण्यात आले आहे.  यासंपूर्ण निविदा प्रकियेची सखोल चौकशी केल्यास निविदा प्रकियेतील सावळागोंधळ पुढे येण्याची शक्यता आहे 


मूल तालुक्यातील मौजा फिस्कुटी ग्राम पंचायतला सन 2020-21 या आर्थीक वर्षात जिल्हा निधी आणि जनसुविधा योजनेअंतर्गत 23 कामांसाठी जवळपास 49 लाख 46 हजार रूपये मंजुर झाले होते, याकामासाठी ऑफलाईन पध्दतीने निवीदा काढण्यात आली होती त्यानुसार डि. बी. कंस्ट्रक्शन, D. B. Constructionराजु झाडे आणि अंबर तिरपुडे यांनी निवीदा दाखल केली होती, यासर्व कामात डि बी कंस्ट्रषन या कंपनीला अंदाजपत्रकीय किंमतीच्या 0.10 कमी दराची निविदा मंजुर करण्यात आले आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर राजु झाडे यांनी 1.5 आणि अंबर तिरपुडे यांच्या नावाने 2 टक्के दराने निवीदा दाखल केली होती, हे संपुर्ण कामे डि बी कंस्ट्रषन कंपनीला मंजुर करण्यात आली आहे.  सन 2021-22 मध्ये जिल्हा निधी आणि जनसुविधा योजनेअंतर्गत जवळपास 77 लाख 66 हजार रूपये मंजुर केले होते, त्यानुसार 22 कामे मंजुर करण्यात आले होते, यासर्व कामामध्ये डि. बी. कंस्ट्रषन यांनी अंदाजपत्रकीय किंमतीनुसार निवीदा दाखल केले होती, तर राजु झाडे यांनी अंदाजपत्रकीय किंमतीपेक्षा 1.5 टक्के जास्त दाराची आणि अंबर तिरपुडे यांनी अंदापपत्रकीय किंमतीपेक्षा 2 टक्के जास्त दराने निवीदा दाखल केली होती, हे संपुर्ण कामे एकाच डि बी कंस्ट्रक्शन ला ऑफलाईन निवीदा पध्दतीने मिळाले आहे. मात्र यासंपुर्ण 45 कामाच्या निवीदा प्रक्रियेत राजु झाडे आणि अंबर तिरपुडे यांनी अंदाजपत्रकीय किंमतीच्या 1.5 जास्त दराने आणि अंबर तिरपुडे यांनी अंदाजपत्रकीय किंमतीच्या 2 टक्के जास्त दराने निवीदा टाकलेली होती हे विशेष.महाविकास आघाडी सरकारच्या काळापासुन अनेक विकासकामे निधी अभावी रखळलेले आहेत, जिल्हयातील अनेक ंकंत्राटदाराकडे कामे नाही, आणि कामाच्या निवीदा निघाल्या तर अंदाजपत्रकीय किंमतीच्या 20 ते 25 टक्के कमी दराने कंत्राटदाराना कामे मिळत असतानाच फिस्कुटी ग्राम पंचायतने केलेल्या ऑफलाईन निवीदा प्रक्रियेत एकाच कंत्राटदाराला 22 कामे अंदाजपत्रकीय किंमतीने तर 23 कामे 0.10 टक्के कमी दराने कामे कसे काय मिळतात याबाबत तर्कवितर्क लावल्या जात असून निविदा प्रकियेत मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा ऐकण्यात येत आहे  सदर निवीदा प्रक्रियेची आणि कामांची चौकशी होणे गरजेचे आहे.


फिस्कुटीलाच करोडोचा निधी कसा?
मूल तालुक्यातील फिस्फुटी ग्राम पंचायतचे सरपंच नितीन गुरनुले हे भाजपाच्या वजनदार नेते आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले यांचे चिरंजीव आहेत, संध्या गुरनुले हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असताना फिस्कुटी ग्राम पंचायत ला विकासकामे करण्यासाठी करोडो रूपयाचा निधी मंजुर केला आहे.
सदर निधीमधुन नियमानुसार विकासकामे होणे अपेक्षीत आहे मात्र अनेक कामे नियमाला डावलुन होत असल्याची चर्चा आहे.


कोरे निवीदा अर्जासाठी सरपंच/सचिवानीच केले स्वतः अर्ज

जिल्हा निधी आणि जनसुविधा योजनेअंतर्गत मंजुर कामाची निवीदा भरण्यासाठी कंत्राटदारानी कोरे निवीदा अर्ज ग्राम पंचायतकडे अर्ज करून रितसर मागणे आवश्यक आहे. मात्र फिस्कुटीच्या सरपंच, सचिवांनी ग्राम पंचायत फिस्कुटी येथे स्वतःच अर्ज करून कोरे निवीदा अर्जाची मागणी केली असुन माहिती अधिकार कायद्यांतर्गत तशी माहिती सुध्दा सचिवांनी दिली आहे.


संपुर्ण निवीदा प्रक्रिया नियमानुसारच : सचिन दांडेकर 

फिस्कुटी ग्राम पंचायत अंतर्गत 45 कामासाठी केलेली निवीदा प्रकिया नियमानुसारच झाली असुन यात कोणताही सावळागोधळ झालेला नसल्याची प्रतिक्रीया फिस्कुटीचे ग्रामसेवक सचिन दांडेकर यांनी दिली.