वाहतूक पोलीसांची चोर सोडून संन्याशाला फाशी





चंद्रपूर :- होळीची चाहूल लागली की पळसाच्या झाडांना फुलं बहरू लागतात. अगदी तसच धुलीवंदनाच्या अगदी पूर्वसंध्येला राज्य महामार्ग, वाहतूक पोलीस सज्ज होतात. ठिकठिकाणी नाकेबंदी होऊ लागते. तेव्हा "पोलिसांची होळी आली" असे वाक्य सहज अनेकांच्या तोंडून बाहेर पडते. यंदा फेब्रुवारी महीण्यापासून चांगलेच वसुली मोहीमाला सुरूवात केली आहे. राज्य महामार्ग, शहरातील रस्त्यांवर पोलीस दादाचे दर्शन होत असून, वाहनाचे संपुर्ण कागदपत्रे असतांनाही चालान दिले जात आहे.

राजूरा पोलीसांनी एका टेम्पो वाहनधारकाला चालानाची 'बंडी' भरली, त्यामुळे वाहतूक पोलीसांचा सध्या चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम सुरू आहे.
       
   

 मार्च महीना हा आर्थिक वर्ष असतो.या महीण्याचे औचित्य साधत वाहतूक पोलीसांचे चांगभले होते. नुकत्याच जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. पोलीस स्टेशन अंतर्गत आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी वाहन तपासणी सुरू केली आहे.



आपल्या हद्दीच्याही बाहेर जाऊन वाहनांवर कारवाई केली जात आहे. जिल्हयात दारूबंदी उठल्यानंतर बार समोर उभे राहून कारवाई करण्याचे हे कदाचित पहील्यांदाच असेल. बार मधून मद्यपी बाहेर निघताच ड्रंक  ॲन्ड ड्राईव्ह च्या नावाखाली त्यांच्यावर हजारो रुपयांचे चालान देऊन कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावले जातात. वाहनाचे संपुर्ण कागदपत्रे दिल्याशिवाय वाहनेही सोडल्या जात नाही.



तुकूम रोडवरील अनेक बारच्या समोर हा प्रकार पहायला मिळत आहे. वाहन चालवितांना दारू पिणे हे घातक आहेच. तेव्हा कारवाईचा बडगा उगारणे उचित आहे.परंतू बारच्या समोरच मद्यपान करून असल्याचे दाखवत पोलीस स्टेशनला घेऊन जाणे. पोलीस स्टेशन मध्ये दारू पिऊन असल्याचे तपासणी करणे आणि पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करणे हे योग्य आहे का?अश्या प्रकारची चर्चा सध्या रंगू लागली आहे. 


चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण दारूबंदी उठल्यापासून पोलिसांची हफ्तेगिरी बंद झाली आहे. अवैध दारूच्या नावावर अनेकांकडून हफ्ते वसुली  करणाऱ्या पोलिसांचे खिशे रिकामी झाले आहेत, हे खीसे आता पुन्हा भरून काढण्यासाठी आता दारूबंदी उठल्यानंतर चक्क दारू दुकानाच्या समोर उभे राहून कारवाई करण्याचा हा प्रकार सुरू आहे. 


वास्तविक पाहता दारूच्या दुकानात प्रवेश करण्यासाठी दारू पिण्याचा परवाना आवश्यक आहे. कोणत्याही दारूच्या दुकानातून दारू खरेदी करण्यासाठी देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मार्फतीने रिसर्च परवाना घेणे आवश्यक आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही दारू दुकानात परवाना बघून प्रवेश दिला जात नाही. सरसकट कोणालाही प्रवेश देऊन दारू विक्रीचा प्रकार सुरू आहे.  पोलिसांनी अशी कारवाई करण्याच्या ऐवजी सर्वांना परवाना बंधन करावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे.