धनगर dhangar जमातीतील झाडे या उपजातीचा नामसदृश्याचा फायदा घेत गडचिरोली व चंद्रपूरchandrapur gadchiroli जिल्हयातील झाडे कुणबी या जातीचे लोक घुसखोरी करून गैरफायदा घेत आहेत. याबाबत अनेकदा शासन, प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही काहीच कारवाई होत नाही.झाडे कुणबी यांची घुसखोरी थांबवावी अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा गडचिरोली येथिल पत्रकार परिषदेत धनगर समाजाचे डॉ तुषार मर्लावार यांनी केली.
झाडे कुणबी या जातीचे लोक भटक्या जमाती क (एनटी-सी), nt cइतर मागासवर्गीय (ओबीसी) चे बोगस जात प्रमाणपत्र घेत आहेत. गडचिरोली उपविभागीय अधिकारी sdm यांचेकडुन माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीवरुन एकाच व्यक्तीचे एन.टी.-सी व ओबीसी जात प्रमाणपत्र आढळले आहे. तरी एका मुलाचे एन.टी.सी व दुसऱ्या मुलाचे ओबीसी प्रमाणपत्र आढळलेले असून अनेक प्रकरणात बोगसगीरी आढळून आलेले आहे. याबाबत जिल्हाधिकारी collector यांचेकडे तक्रार दाखल करुनही अजुनपर्यंत बोगस व्यक्तीवर फोजदारी कारवाई झालेली नाही.
जात पडताळणी समितीने Caste Verification Committee झाडे या जातीचे एन.टी. सी चे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरविलेले आहेत. मात्र एकदा नौकरी लागल्यावर अधिसंख्य पदावर कायम ठेवण्यात येत आहे. यामुळे धनगर समाजावर अन्याय होत आहे. करीता बोगस नौकरीधारकांना बडतर्फ करण्यात यावे.
गडचिरोली जिल्हयातील पोलीस भरती २०२१ मध्ये २) निशांत गोटेवार २) श्रीकृष्ण दशरथ दुब्बलवार ३) समृध्दी किसनदास पुरकलवार या बोगस झाडे उमेदवारांची भटक्या जमाती क मधुन निवड झालेली आहे. याबाबत मा. जिल्हा पोलीस अधिक्षक गडचिरोली यांचेकडे तक्रार केल्यानंतरही त्यांना रूजु करुन घेतलेले आहे. व जात पडताळणी समीतीकडे पडताळणी करीता प्रकरण पाठविलेले नाही. यावरुन मा. पोलीस अधिक्षक police superintendent यांचे बोगस उमेदवारांना अभय आहे.
गडचिरोली जिल्हा पोलीस भरती २०२२ सुरु असुन या भरतीमध्ये फार मोठया प्रमाणात झाडे कुणबी उमेदवार असुन एकाच आडनावाचे एन. टी. सी. एन. टी. बी. व ओबीसी प्रवर्गात अर्ज दाखल केलेलेआहे. त्यामुळे झाडे या जातीच्या उमेदवाराची चौकशी करुन परीक्षेस बसू देवू नये.
धनगर समाजाचा परंपरागत व्यवसाय हा मेंढया पाळणे आहे. व आजही मेंढयाचा व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह चालवितात. मात्र गडचिरोली-चंद्रपूर जिल्हयातील झाडे यांचा व्यवसाय शेती आहे. त्यामुळे ते धनगर समाजातील तत्सम व इतर उपजातीत मोडत नाहीत. धनगर समाजाचे दैवत खंडोबा, बिरोबा आहे. व महाराणी अहिल्याबाई होळकर, मल्लारराव होळकर यांना धनगर समाज मानतो. मात्र गडचिरोली चंद्रपूर जिल्हयातील झाडे यांचे दैवत वेगळे आहेत. वरील बाबी लक्षात घेता शासन, प्रशासनाने झाडे कुणबी यांची घुसखोरी थांबवावी. अन्यथा तिव्र आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेत धनगर समाजाचे डॉ तुषार मर्लावार,विजय कोरेवार, डॉ नारायण करेवार,विस्तारी फेबुलवार,आदी उपस्थित होते.