मुलीच्या शासकीय वसतिगृहात प्रादेशिक उपायुक्त यांनी गिझर बसविले
औरंगाबाद:- समाज कल्याण खात्याच्या अंतर्गत शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनीं यांच्या सोबत प्रत्यक्ष अधिकाऱ्यांचा संवाद व्हावा यासाठी संवाद उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. संवाद कार्यक्रमाच्या अंतर्गत श्रीमती जयश्री सोनकवडे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण,औरंगाबाद यांनी गुणवंत मुलीचे शासकीय वसतिगृह,औरंगाबाद या वसतिगृहास भेट दिली असता भेटीदरम्यान विदयार्थीनीशी संवाद सांधला. विदयार्थीनीशी अनेक विषयावर सखोल चर्चा झाली.
विदयार्थीनीनी त्यांच्या समस्या मांडल्या त्यामध्ये प्रामुख्यान अंधोळीसाठी गरम पाणी मिळत नसल्याचे सांगितले. गेल्या एक वर्षभरापासून मुलींना आंघोळीसाठी गरम पाणी मिळत नव्हते. त्याअनुंषगाने प्रादेशिक उपायुक्त यांनी तात्काळ संबंधित गृहपाल व गृहप्रमुख यांच्याशी चर्चा करुन विदयार्थीनीना अंधोळीसाठी गरम पाणी मिळण्यासाठी गिझर बसविण्यासाठी सुचना दिल्या. स्वतः प्रादेशिक उपायुक्त यांनी पुढाकार घेतल्याने संबंधित गृहपाल व गृह प्रमुख यांनी सूचनांचे पालन करत
गुणवंत मुलीचे शासकीय वसतिगृह,औरंगाबाद येथे 2 गिझर, 250 मुलींचे शासकीय वसतिगृह (नवीन) पुष्पनगरी,औरंगाबाद येथे 2 गिझर, मुलींचे शासकीय वसतिगृह समर्थनगर येथे 2 गिझर तर मुलींचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक 4 येथे 4 गिझर बसविण्याचे आदेश काढुन दोनंच दिवसात एकुण 10 गिझर बसविले. तसेच या विभागातील अन्य जिल्हाच्या सहाय्यक आयुक्तानांही तात्काळ शासकीय वसतिगृहात गिझर बसविण्याचे आदेश दिले.
शासकीय वसतिगृहात तात्काळ गिझर बसविल्यामुळे विदयार्थीनीनी, गृहप्रमुख व गृहपाल यांनी मा.प्रादेशिक उपायुक्त व प्रशासनाचे आभार मानले.