आदीवासी, मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेशसमाजाचे प्रश्न सोडविताना राजकारणाची सांगड घालावी लागते,राजकारण समस्येची खिल्ली आहे, कोणतीही समस्या सोडविण्यासाठी राजकिय पक्षाकडे समस्या सोडवावे लागते त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष हे मुळातच राजकिय नेतृत्व निर्माण करणारी चळवळ आहे.या पक्षाने अनेक नेतृत्व उभे केले आहे. राष्ट्रीय समाज पक्ष मागणारा नाही तर देणारा पक्ष आहे.त्यामुळे युवकांनी राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी समोर यावे असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ (नाना) शेवते, यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या चंद्रपूर chandrapur दौऱ्यावर असतांना कार्यकत्यांना संबोधित करताना केले,
राष्ट्रीय समाज पक्ष चंद्रपूर शाखेच्या वतीने दि.२४ डिसेंबर २०२२ रोजी वसंत भवन येथे कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी मा.ज्ञानेश्वर माऊली सलगर मुख्य महासचिव महाराष्ट्र,विदर्भ संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील, विदर्भ मुख्य महासचिव संजय कन्नावार, नागपूर उपाध्यक्ष दत्ताजी मेश्राम,व्हिजेएनटी नेते आनंद अंगलवार, वाहतूक आघाडी विदर्भ महासचिव अनुप यादव, कैलास उराडे, सुनिल पोराटे, कुमार जुनमलवार, बल्लारपूर तालुका प्रभारी अध्यक्ष साईनाथ येवले,आदी उपस्थित होते,


मुस्लिम आदीवासी समाजातील युवकांचा प्रवेश
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रनायक ,माजी मंत्री ,राष्ट्रीय अध्यक्ष, आमदार महादेव जानकर Mahadev jankar यांच्या विचारांवर प्रेरीत होऊन अनेकांनी नागपूर येथील कार्यक्रमात पक्षप्रवेश घेतला,त्यांच्याच अश्या कणखर नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रदेशाध्यक्ष व महासचिव यांच्या दौऱ्या दरम्यान चंद्रपूर येथील कार्यक्रमात बल्लारपूर येथील मुस्लिम समाज संघटनेचे सय्यद रज्जाक ,आदीवासी समाज संघटनेचे अशोक मडावी, संदीप कुळमेथे यांनी पक्ष प्रवेश घेतला.