धक्कादायक अवघ्या दोन दिवसात सहा वाघांचा मृत्यूदोन दिवसांपूर्वीच ताडोबाच्या बफर क्षेत्रातील आगरझरी tadhoba aagarzari येथे एक बछडा आणि शिवनी shivniक्षेत्रात वाघीणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या tadhoba tiger project हिरडी नाला परिसरात वाघांची 4 मृत पिल्लं आढळल्याची घटना घडली आहे. या चारही मृत पिल्लांचं वय अंदाजे 3 ते 4 महिने आहे. मृत पिलांच्या अंगावर जखमा असल्याने परिसरात असलेल्या अन्य एखाद्या मोठ्या वाघाने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..

मागील अवघ्या दोन दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात 6 वाघांच्या मृत्यूची (tigers death) नोंद झाली झाल्याने वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे.जंगलातील वाघांचा संघर्ष की आणखी कुठलं कारण वाघांच्या मृत्यूस कारणीभूत यांची चौकशी करण्यासाठी वनविभाग पुढे येईल का ? हा प्रश्न या निमित्यानेसमोर येत आहे.दरम्यान जंगलातील वाघांच्या शिकारी थांबल्या पण वाघांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येत नाही आणि दिवसेंदिवस वाघांच्या मृत्यूच्या बातमीत वाढ होताना दिसत असल्याने वनविभागाने Forrest dipartment याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी वन्यप्रेमी यांची मागणी आहे.