सिमेंट फॅक्टरीला भिषण आग,३ कन्वेअर बेल्ट जळून खाक Heavy fire breaks out at cement factory, 3 conveyor belts burnकोरपना तालुक्यातील दालमिया सिमेंट Dalmia Cement in Korpana Talukaकंपनीमध्ये शुक्रवारी पहाटे सिमेंट मिलजवळ भिषण आग A terrible fire लागल्याने तीन कॅन्वेअर बेल्ट जळून खाक झाल्याची माहिती आहे.आग कन्वेअर बेल्ट व्यतिरिक्त इतरत्र पसरली नसल्यामुळे मोठी हानी टळले आहे.

कोरपना तालुक्यातील नारंडा स्थित दालमिया कंपनीमध्ये पहाटे ५ वाजताच्यादरम्यान कंपनी परिसरातील सिमेंट मिल जवळ असलेल्या सिमेंट पास करणाऱ्या बेल्टला आग लागली. बेल्ट चालू असल्याने आगीची भिषणता वाढत गेली. त्यामुळे कन्वेयर बेल्ट १, २ व ३ हे तिनही बेल्ट जळून खाक झाल्याची माहिती आहे. प्रत्यक्षदर्शी नुसार बेल्ट चालू असल्याने घासला गेला त्यामुळे ही आग लागल्याची सांगण्यात येत आहे.

कंपनी प्रशासनाने सावधगिरी बाळगत आपल्या कंपनीतील फायर ब्रिगेडच्या वतीने आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले परंतू आगीची तीव्रता अधिक असल्याने अल्ट्राटेक, माणिकगड, अंबुजा येथील फायर ब्रिगेड यांना पाचारण करून आगीवर नियंत्रन मिळविले.

सिमेंट कंपनीतील कामगाराची शिफ्ट सकाळी ६ वाजता व नंतर जनरल ८.३० वाजता सुरू होते. त्यामुळे कामगाराची संख्या अधिक नव्हती व जवळपास काम करणारे कामगार यायचे असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.