धक्कादायक पुन्हा चंद्रपुरात गळा चिरून हत्याचंद्रपूर :- दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या durgapur police station हाकेच्या अंतरावर गळा चिरून हत्या केल्याने शहरात दहशत निर्माण झाली आहे.नुकताच काही दिवसांपूर्वी महेश मेश्राम Mahesh meshram या युवकांचा गळा चिरून मृत्यू झाल्याचे घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा गळा चिरून हत्या झाल्याचे समोर आले आहे.

दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या अगदी २०० मिटर अंतरावर असलेल्या ग्राम पंचायत उर्जानगर urjanagar भवनात आरोपी प्रथम वाढई Prathamesh wadai वय २१ वर्ष यांनी विकास गणविर वय ४७ वर्ष यांचा धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केली.मृतकाची मुलगी आरोपींवर प्रेम करत होती मात्र बाप अडसर येत असल्याने आरोपीनी प्रेयसीच्या वडीलाचाच काटा काढीत चक्क गळाच चिरून टाकला. ही हत्या करण्यापूर्वी आरोपींनी मृतकाला घरातून प्रेमाने बोलावून नेले.व तिथेच बाचाबाची झाल्यानंतर आरोपीने हत्या केल्याचे बोलल्या जात आहे.
सदैव तप्तर असणारे दुर्गापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्निल धुळे swapnil dule यांच्या हद्दीत महीणाभरात हे दुसरे प्रकरण घडले आहे.याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत महीणाभरापुर्वी महेश मेश्राम यांचा धारधार शस्त्राने हत्या करून मुडंक्यासोबत फुटबॉल सारखे खेळ खेळत हत्या केली त्याची शाही वाळता न वाळता हे दुसरे प्रकरण घडले.त्यामुळे दुर्गापूर परीसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे घटनेच्या एक दिवसांपूर्वी आरोपींनी मृतकाच्या घरी कुऱ्हाड घेऊन मारण्यासाठी गेला होता मात्र वेळीच पोलीसांनी आरोपीच्या हातातून कुऱ्हाड घेऊन प्रकरण शांत केले.मात्र आरोपींची मनातील दगदग शांत झाली नव्हती त्यामुळे आज त्याचा वचपा काढल्याची चर्चा आहे.सध्या चंद्रपूर हे हत्यापूर शहर झाले आहे.