भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली राष्ट्रीय समाज पक्षाची दखल
राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थितीत आहे. काम संथ गतीने असून कामाची गुणवत्ता ढासळली आहे. त्याबाबत महामार्गाचे काम लवकरात लवकर करण्यात यावा, कामाचा गुणवत्ता तपासणी करावी, यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य भगवान ढेबे यांनी निवेदनाद्वारे केली होती . भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने त्याची दखल घेत मेसर्स सुप्रीम पनवेल इंदापूर टोलवेज प्रा. लि. हा Concession Agreement प्रमाणे विहित मुदतीमध्ये काम पूर्ण न करू शकल्यामुळे कलम ३७ अंतर्गत मेसर्स सुप्रीम पनवेल इंदापूर टोलवेज प्रा. लि. यांना दिनांक १७.११.२०२१ रोजी Terminate करण्यात आले असल्याचे पत्र राष्ट्रीय समाज पक्षाचे विभागीय कार्यालयाला देण्यात आले.

राष्ट्रीय महामार्ग नागपूर मुंबई, मुंबई गोवा, मुंबई कन्याकुमारी असे मोठ्या महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५२० किमीच्या नागपूर ते शिर्डी या समृध्दी महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले. नागपुर ते मुंबई समृध्दी महामार्ग असून पहील्या टप्प्यात सध्या ५२० किमीचे अंतर अवघ्या ७-८ तासांत पार केला जात आहे.आणि टोल ८४० रूपये द्यावे लागत आहे.


मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या पनवेल ते इंदापूर कि.मी. ०.०० ते कि.मी. ८४.०० या लांबीतील चौपदरीकरणाचे काम (Flexible Pavement) खाजगीकरणाअंतर्गत BOT तत्वावर मेसर्स सुप्रीम पनवेल इंदापूर टोलवेज प्रा लिमीटेड या कंपनीला देण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थितीत आहे. काम संथ गतीने असून कामाची गुणवत्ता ढासळली आहे. त्याबाबत महामार्गाचे काम लवकरात लवकर करण्यात यावा, कामाचा गुणवत्ता तपासणी करावी, यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य भगवान ढेबे यांनी निवेदनाद्वारे केली होती .

मात्र Concessionaire मेसर्स सुप्रीम पनवेल इंदापूर टोलवेज प्रा. लि. यांनी Termination Order ला Hon'ble दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान केले होते व प्रकरण लवादामध्ये न्यायप्रविष्ठ होते तद्वंतर लवादाने मेसर्स सुप्रीम पनवेल इंदापूर टोलवेज प्रा. लि. यांचा दावा खारीज केला. परंतु, पुन्हा मेसर्स सुप्रीम पनवेल इंदापूर टोलवेज प्रा. लि. यांनी Hon'ble दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे व सुनावणी पूर्ण झाली असून मा. उच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी दावा खारीज केला आहे.त्यामुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पनवेल ते इंदापूर हे काम दोन टप्यात पूर्ण करण्याचे ठरविले असल्याचे पत्र राष्ट्रीय समाज पक्षाचे विभागीय कार्यालयाला देण्यात आले आहे.