सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करा जानकरांची विधीमंडळात मागणी




गेल्या कित्येक वर्षांपासून सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करा अशी मागणी आहे. कायदा पारीत करण्यासाठी संसदेत मंजूर करण्यासाठी भाग पाडले पाहिजे .त्या त्या समाजाचे विकास करायचे असेल तर या देशात कोणता समाज किती आहे.राजकिय सामाजिक आर्थिक किती मिळाले आहे. त्याना किती टक्केवारी मिळाली आहे.ही माहीती मिळाली पाहीजेत यासाठी जातीनिहाय जनगणना करा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी विधीमंडळात केली.


धनगर समाजाच्या १३योजनेला निधी द्या
धनगर समाजासाठी मागील फडणवीस सरकारने १ हजार कोटी खर्च करून आदीवासी योजनेच्या धर्तीवर १३ योजना लागू करण्यात आले होते .त्या योजना सध्या निधी नसल्याने ही थंड बस्त्यात आहे.ती योजना कार्यान्वित करून निधी देण्याची मागणी केली.

तालुक्यात वैद्यानिक महामंडळ निर्माण करा

विदर्भ मराठवाडा महामंडळाच्या धर्तीवर दुष्काळी तालुक्यासाठी एखादा वैद्यानिक महामंडळ निर्माण करता येईल का ? केल्यास दुष्काळी तालुक्यांच्या ठिकाणी विकास करता येईल अशी ही मागणी त्यांनी यावेळी केली