राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री राष्ट्रनायक तथा आमदार महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भात विविध स्तरांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत कसे पोहचवीता येईल दृष्टीने प्रदेशाध्यक्ष काशीनाथ (नाना) शेवते, ज्ञानेश्वर (माऊली)सलगर मुख्य महासचिव ,विदर्भ अध्यक्ष ॲड रमेश पिसे,विदर्भ संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील,विदर्भ मुख्य महासचिव संजय कन्नावार, दत्ता मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर येथील वसंत भवन येथे दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी यांच्या कडून करण्यात आले आहे