जानकारांनी दिले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मेंढपाळ हिताच्या सुचनानुकताच सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मेंढपाळांच्या प्रश्नांवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही चार जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर मेंढपाळांच्या समस्या लक्षात घेऊन चराई लायसन्स देण्याच्या सूचना केली मात्र आमदार महादेव जानकर Mahadev jankar यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून वनमंत्र्यांना प्रत्येक जिल्ह्यात मेंढपाळ इंडस्ट्रीयल क्लस्टर तयार करावा जेणेकरून लोकरीच्या उद्योगासाठी चालना मिळेल,मेंढपाळांच्या विकासासाठी दोन हजार कोटी रुपये अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळास देण्याची विनंती महादेव जानकर यांनी केली.यावेळी मेंढपाळाच्या मुलांनी किती दिवस मेंढरं राखत ठेवाल,त्यांनाही आयपीएस, एमपीएस अधिकारी बनण्याची संधी द्या असे सभागृहात केले.
नुकताच काही दिवसांपूर्वी काही पदाधिकारी आमदार महादेव जानकर यांची भेट घेत मेंढपाळाच्या समस्येचा पाळा वाचला होता तेव्हा जानकर साहेबांनी शिष्टमंडळाला सभागृहात मांडणार असल्याचे सांगितले होते.त्याचे आज प्रत्यक्ष सभागृहात मांडणी करून मेंढपाळाचा आवाज उचलल्याची भावना मेंढपाळाकडून करण्यात येत आहे.