चामौर्शी सहकारी खरेदी विक्री संघाची अविरोध निवडणूकचामौर्शी :- तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक नुकताच होऊ घातली होती.त्यात अतुल गण्यारपवार व इतर संचालकांची अविरोध निवड करण्यात आली.संचालक मंडळ निवडणूक सन २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीकरीता निवड करण्यात आली.यात सर्वसाधारण व्यैयक्तीक प्रतीनिधी गटातून अतुलभाऊ गंगाधरराव गण्यारपवार, अमोल गंगाधरराव गण्यारपवार,निलेश गुरूदास चुधरी,महादेव लहुजी पिपरे,संलग्न सहकारी संस्था गट प्रतीनिधीतून श्यामराव भाऊजी पोरटे, नामदेव आडकुजी किनेकर,वामन रामचंद्र गौरकार,अरूण पुल्लन्नाजी बंडावार,अनु.जमातीतून अरूण काशीनाथ लाकडे, इतर मागास प्रवर्गातून मुरलीधर डोमदेव बुरे,भटक्या विमुक्त जाती/जमाती/वि.मा.प्र. साईनाथ अंकलूजी पेशट्टीवार,महीला राखीव मंजुषा मोरेश्वर चलकलवार,मालताबाई गुलाबसिंग धोती,हे सर्व उमेदवार संस्थेच्या व्यवस्थापन समीतीच्या त्या त्या जागेवरून निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषीत केले. निवडणूक निर्णय अधिकारी एस एल रंधये चामौर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या.चामौर्शी यांनी काम पाहिले.