आता ग्राम पंचायत निवडणूक अर्ज ऑफलाईन स्विकारण्याची परवानगी




ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाने election commission दिली. निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिका-यांना दि. १ डिसेम्बर रोजी पत्र निर्गमित केले आहे. वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी grampanchayat election २८ नोव्हेम्बर ते २ डिसेम्बर या कालावधीत उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविणयात आले आहे.३० नोव्हेम्बर पासून आयोगाची वेबसाइट अतिशय मंदगतीने सुरु असल्याने उमेदवारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, ते अर्ज ऑनलाइन online पद्धतीने सादर करू शकत नाहीत .त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे उमेदवारांना ऑफलाइन offline पद्धतीने अर्ज भरण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक आयोगाकड़े केली , आयोगातर्फे सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन देखील दिले. निवडणूक आयोगातर्फे तातडीने दखल घेतली गेली व सर्व जिल्हाधिका-यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारण्याचे निर्देश देण्यात आले आहे.