आदीवासींचे भगवान "बिरसा मुंडा" हेच.....मा.गंगाधर बनबरे



चंद्रपुर- जल, जंगल आणि जमीन साठीची लढाई शतके जुनी आहे. या लढाईत शेकडो नायक आले आणि गेले, परंतु हा लढा आजही कायम आहे. मोहक आणि बंडखोर नेता बोलत नेता ज्याच्या एका आदेशावर शेकडो लोक जमले आणि त्यांनी इंग्रजाना खाली गुडघे टेकायला भाग पाडले व इंग्रजावर वार केले. असे ते आदिवासी कांतिसूर्य बिरसा मुंडा जे एक आदिवासी नेते आणि लोकनायक म्हणून इतिहासात त्यांची नोंद झाली, असे प्रतिपादन शिवमहोत्सव समिती चंद्रपूर द्वारा आयोजित तिन दिवसीय व्याखानमालेच्या पहिल्या दिवसी "जननायक बिरसा मुंडा आणि आदिवासी अस्मिता" या विषयावर मा. गंगाधर बनबरे, प्रसिद्ध विचारवंत आणि व्याख्याते, पुणे यांनी स्थानिक प्रियदर्शिनी ‍इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे केले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिवमहोत्सव समितीच चंद्रपूर द्वारा सातव्या व्याख्यानमालेचे आयोजन दिनांक 11, 12 व 13 नोवेंबरला या दररोज सायंकाळी 6 ते 9 ला करण्यात आलेले असून दिनांक 11 नोव्हेंबरला झालेल्या पहिल्या दिवसी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. संतोष कुचनकर, जिल्हाध्यक्ष मराठा उद्योजक कक्ष, चंद्रपूर, उदघाटक मा. प्रकाश जाधव, माजी खासदार, रामटेक, प्रमुख व्याख्याते मा. गंगाधर बनबरे, प्रसिद्ध व्याख्याते , पुणे, मा. डॉ. चेतन खुटेमाटे अध्यक्ष, शिवमहोत्सव समिती चंद्रपुर, मा. दिपक खामणकर, जिल्हाध्यक्ष मराठ सेवा संघ, मा. शामकांत थेरे संचालक, बलशिव ट्रान्सपोर्ट कंपनी चंद्रपूर, मा. डॉ. शुभांगी वासाडे, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ्, चंद्रपूर, मा. डॉ प्रिती बांबोळे प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ्, चंद्रपूर, मा. रविभाऊ आसुटकर, संचालक A to Z मेडीकल एजन्सी, मा. इंजि. अक्षय उरकुडे, संचालक, नायरा पेट्रोलियम, मारेगाव, मा. अश्विनी जाधव, C.A. पुणे यांची उपस्थिती होती.

पुढे मा.गंगाधर बनबरे म्हणाले की, बिरसा मुंडा यांना ब्रिटिशांविरुद्ध अत्यंत द्वेष होता. ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढयात बिरसा मुंडा यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. हा जाननायक मुंडा जातीचा होता. भारतातील रांची आणि सिंहभूमीचे आदिवासी बिरसा मुंडाला 'बिरसा भगवान' म्हणून ओळखतात. आदिवासींवर होत असलेल्या इंग्रज्ञांचा दडपणाविरुद्ध बिरसा मुंडा यांनी जो लढा लढविला त्यामुळे त्यांना हा आदिवासींकडून देण्यात येणारा मान आहे.

19 व्या शतकात बिरसा मुंडा भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील एक महत्वाचे लोकनेते उदयास आले. आदिवासिनां लावलेला त्यांच्या भूमी युद्धाचा वारसा शतकानुशतके प्राचीन आहे. मुंडा आदिवासीच्या नेतृत्वात 19 शतकातील बंडखोर नायक बिरसा मुंडा यांनी महान अशी एक चळवळ उभी केली या चवळीलाच उलगुलान असे संबोधल्या जाते.

उलगुलान या चळवळीच्या माध्यमातून उठाव करताना ब्रिटिश सैन्य हरले, परंतु नंतर या भागातील अनेक आदिवासी नेत्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे उलगुलान ओळखले जाणारे हे बंड फार काळ टिकू शकले नाही. ब्रिटीशांनी चळवलीला जोरदार चिरडले आणि 3 फेब्रुवारी 1900 रोजी बिरसा मुंडा यांना चक्रधरपूर येथून अटक केली गेली आणि त्यांच्या एका वर्षांनंतर ते तुरुगात कॉलरा आजाराने मरण पावले, असे म्हणतात. पण त्यांना इंग्रजांनी विष देऊन मारण्यात आले होते असे बनबरे म्हणाले.

या कार्यक्रमाची भूमिका शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष मा. डॉ. चेतन खुटेमाटे यांनी यावेळी समजाऊन सांगितली. तसेच कार्यक्रमाचे उदघाटक मा. प्रकाश जाधव, माजी खासदार रामटेक यांनी उदघाटनपर भाषण करतानां असे म्हटले की, असे कार्यक्रम होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण यामुळे इतिहासात नोंद झालेल्या महापुरुषांना लोकांसमोर आणण्यास मदत होते असे ते म्हणाले.

यावेळी पहिल्या दिवसाचे ज्यांनी पुष्प दिले. त्या अश्विनी जाधव या बोलताना म्हटल्या की मला मराठा सेवा संघाने खुप काही दिले. यामुळे मी 22 व्या वर्षी CA बनू शकली. अशा त्या म्हणाल्या. अश्विनी जाधव यांनी आपल्या पहील्या पगारांची रक्कम प्रेरणा पुष्प म्हणून शिवमहोत्सव समिती पहिल्या दिवसी व्याख्यानमालेकरिता देणगी दिली. अध्यक्षीय भाषण करताना मा. संतोष कुचनकर यांनी म्हटले की बिरसा मुंडा हे ब्रिटिश काळात एक जननायक होऊन गेले. 25 व्या वर्षी त्यांनी आपल्या कर्तृतवाची नोंद इतिहासात केली. ते खुप महान पुरुष होते असे म्हनाले.

यावेळी स्मृतिशेष दादाजी पाटील गणपतराव आसुटकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मा. रविभाऊ आसुरटकर यांच्याकडून कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना सन्मानचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मा. अर्चना चौधरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन हे प्रा. किरणकुमार मनुरे यांनी मानले, कार्यक्रमाला चंद्रपूर तसेच परिसरातील हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिवमहोत्सवं समिती च्या सदस्यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले.