चंद्रपूर :-लगत असलेल्या दुर्गापूर परिसरात चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राच्या मेजर गेट जवळील नायरा पेट्रोल पंपजवळ एका इसमाची धारदार शास्त्राने धडावेगळे शीर करून निर्घृण हत्या करण्यात आली.ही घटना सोमवारी रात्री 10.45 वाजताच्या सुमारास घडली. महेश मेश्राम (32) रा. आयप्पा मंदिर परिसर चंद्रपूर असे मृतकाचे नाव असल्याचे बोलले जात आहे.या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळापासून काहीच अंतरावर दुर्गापूर पोलीस ठाणे आहे. सुमारे ४-५ जणांनी मिळून आरीने शीर कापून हत्या केल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती होताच दुर्गापूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच घटनास्थळावरून हलविला.दुर्गापूर परिसर हा गुन्हेगारीच्या दृष्टीने अतिसंवेदनशील मानला जातो. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. मृतकाने काही दिवसांपूर्वी कुणाला तरी मारहाण केली होती. यातूनच ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे.
घटनास्थळाजवळ इमली बियर बार आहे. या बारमध्ये भांडण झाले. येथून महेश मेश्राम याला अज्ञात आरोपींनी मारहाण करीत पेट्रोल पंप परिसरात नेले. तेथे दगडाने मारहाण केली. यानंतर धारधार शस्त्राने शीर धडावेगळे करून हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे. रात्री 12.20 वाजता पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी हे ठाणेदार स्वप्नील धुळे यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेत आहे.