नागपूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते , महासचिव ज्ञानेश्वर सलगर, विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा.ॲड.रमेश पिसे,संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय कन्नावार यांची विदर्भ महासचिव यापदावर निवड करण्यात आली.यावेळी त्यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.तसेच अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी प्रदीप पातुर्डे, अमरावती युवक आघाडी जिल्हाध्यक्ष पदी अक्षय कात्रे, चंद्रपूर शहर अध्यक्ष पदी दिनेश भोंगळे,सौ.संध्याताई शेठे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नागपूर शहर,उत्तम चव्हाण सचिव पुर्व नागपूर विधानसभा, प्रमोद मडावी सचिव ग्रामीण नागपूर विधानसभा, विलास कळबे सदस्य नागपूर ग्रामीण आदींची यावेळी निवड करण्यात आली
राष्ट्रीय समाज पक्षाच्या म्हाळगी नगर येथील विदर्भ कार्यालयात विदर्भ स्तरीस आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून अनेक पदावर नियुक्त्याही करण्यात आले.या विदर्भ स्तरीस आढावा बैठकीस अध्यक्ष म्हणून हरीकिशन हटवार हे होते.यावेळी विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रा.ॲड.रमेश पिसे,विधी आघाडीचे विदर्भ अध्यक्ष ॲड वसुदेव वासे, रामदास माहुरे, पुरूषोत्तम कामडी,देविदास आगरकर, नंदकिशोर काळे,दत्ता मेश्राम,रिमाताई चव्हाण, प्रकाश सोनटक्के, वसंत वानखेडे, डॉ प्रशांत सिंगाडे,अरण चुरड, आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने ओबीसी आरक्षण जागर यात्रा काढण्यात येणार असून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे आवाहन विदर्भ अध्यक्ष ॲड रमेश पिसे यांनी केले आहे.संजय कन्नावार यांच्या नियुक्तीने पक्ष वाढीचे काम जोमाने सुरू होईल अशी आशा व्यक्त करीत अभिनंदनही केले.