चंद्रपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे नुकताच विदर्भ दौऱ्यावर आले होते.तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यात काही नविन घडामोडी घडेल अशी अपेक्षा वर्तवली जात होती.मात्र ठाकरे यांनी याबाबत कुठलीच घोषणा न करता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकी घेत पद निवड ही गुलदस्त्यात ठेवली.मात्र आज अचानक विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांची निवड केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राहुल बालमवार हे विद्यार्थी दशेपासून मनसेची धुरा सांभाळत आहेत.त्याच्या या तळमळीने त्यांना जिल्हाध्यक्ष पदाचे सुत्र हाती देण्यात आल्याने मनसैनिकामध्ये प्रचंड गोंधळ उडालेला आहे.त्याच्या या निवडीमुळे "कही खुशी कही गम" अशी स्थिती निर्माण झाली आहे.