राज्य सरकारने धनगर समाजातील मुलाच्या शिक्षणासाठी विभागनिहाय वसतीगृहासह अदिवासी विभागाच्या धर्तीवर १२ योजनाना मंजुरी दिल्याचा आदेश काढला असल्यांची माहीती राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिली आहे.
याबाबत महादेव जानकर म्हणाले की, धनगर समाजाला एसटीचे आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी ही समाजाची मुख्य मागणी आहे. मात्र या मागणीला काही कारणाने उशीर होत असल्यांने आम्ही समाजाची प्रगती होण्यासाठी एसटी च्या सवलती लागु करण्यांची मागणी तत्कालिन मुख्यमंत्री देवेद्र फडणविस यांच्याकडे केली होती. 'या मागणी साठी भाजपसेना सरकार मधे मी मंत्री असताना धनगर समाजातील मुलांच्या शिक्षणा सह आदिवाशी समाजा प्रमाने सोई सुविधा मिळाव्यात म्हणुन योजनाचा प्रस्ताव मी सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तयार केला होता. मात्र राज्यात सत्तातर होऊन महाविकासआघाडीचे सरकार आल्याने त्यांनी या प्रस्तावाचा शासन आदेश काढला नाही. राज्यात नव्यांने शिंदे फडणविस सरकार आल्यांने त्यांच्या कडे योजनाच्या अंमल बजावणीची मागणी केली. त्यांनी तत्काळ आदेश देत शासन निर्णय काढल्याने त्यांचे आभार जानकर यांनी मानले. उच्च शिक्षणा साठी मुलांच्या वस्तीगृहासाठी मी मंत्री असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या जागा प्रत्येक विभागात देण्यात आल्या. प्रत्येक विभाग त्यानंतर जिल्हा व तालुका स्तरावर वस्तीगृह असावेत अशी समाजाची मागणी होती. त्यानुसार सरकारने खालील बारा योजनांचा शासन आदेश काढला असुन सर्वानी योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी केले आहे.
योजना पुढील प्रमाने - १) भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवी मुंबई, नाशिक,औरंगाबाद, पुणे, नागपूर, अमरावती या महसूली विभागांच्या ठिकाणी वस्तीगृह निर्माण करणे.
२ ) वसतीगृहापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वीत करणे.
३) गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देणे.
४ ) धनगर समाजाच्या बेघर कुटुंबियांना १०,००० घरकुले बांधून देणे.
५) समाजासाठी आवश्यक असलेल्या परंतु अर्थसंकल्पीत निधी उपलब्ध नसलेल्या कार्यक्रम / योजना राबविण्यासाठी न्युक्लियस बजेट योजना राबविणे.
६) समाजातील युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मुलभूत प्रशिक्षण देणे.
७) केंद्र शासनाच्या स्टार्ट अप इंडिया योजनेतर्गत भटक्या जमाती क या प्रवर्गातील नवउद्योजकांना सहाय्य करणसाठी मार्जिन मनी उपलब्ध करून देणे.
८) होतकरू बेरोजगार पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परीक्षा / निवासी प्रशिक्षण देणे.
९ ) समाजातील बेरोजगार युवक-युवतींना स्पर्धा परिक्षासाठी परिक्षा शुल्क आर्थिक सवलती लागू करने .
१०) ७५ टक्के अनुदानावर ४ आठवडे या सधारीत देशी प्रजातीच्यावयाच्या सुधारीत देशी प्रजातीच्या १०० कुकुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अर्थसहाय्य देणे.
११ )धनगर समाजातील भूमीहीन मेंढपाळ कुटुंबांसाठी अर्धबंदिस्त आणि बंदिस्त मेंढी पालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे. किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तथा अर्थ सहाय्य देणे.
१२ ) मेंढपाळ कुटुंबाना पावसाळयात चराई करण्याकरीता जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीसाठी अनुदान देणे.
या महत्वाच्या योजना लागु करण्यांत आल्या असुन यांची अमलबजावणी करण्यांचे आदेश शासनाने संबंधीत विभागाला दिले आहेत. समाजातील तरुणांनी ही योजना तळागाळातील वंचीत घटका पर्यन्त पोहचविण्यांचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष या योजनांचे प्रणेते आमदार महादेव जानकर यांनी केले आहे ..