रासपचे १७ जुलै रोजी विदर्भ स्तरीय बैठक नागपुरात



राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक मा.आ. महादेव जानकर साहेब यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष काशिनाथ( नाना )शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर यांचे मार्गदर्शनात
राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा. ऍड. रमेश पिसे यांच्या अध्यक्षतेत रविवार दिनांक 17 जुलै 22 ला दुपारी 3::00 वा. " रासपचे विदर्भ प्रदेश जनसंपर्क कार्यालय " म्हाळंगी नगर चौक,रिंगरोड, एच.पी. पेट्रोल पंपसमोर नागपूर येथे विदर्भस्तरीय आढावा बैठक आणि पदनियुक्ती कार्यक्रम होणार आहे.

या बैठकीला रासपचे विदर्भ संपर्क प्रमुख कृषि सम्राट राजेंद्र पाटील, विधि आघाडीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष ऍड. वासुदेव वासे,अतुलभाऊ गण्यारपवार, नागपूर शहर अध्यक्ष डॉ. अनंत नासनूरकर, प्रा. सुधीर सुर्वे आदी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रा. बलदेव आडे, पुरुषोत्तम डाखोळे,हरिकिशनदादा हटवार, पुरुषोत्तम कामडी, संजय कन्नावार, रामदास माहुरे,संजय रामटेके, रमेश शेबे, अनिल ठवरे, प्रेम महेशकर, डॉ. प्रशांत शिंगाडे,डॉ ज्ञानेश्वर वगरे, उमेश कोराम, देविदास आगरकर, अरुण चुरड, पांडुरंग शेबे, निलेश चांडक, कल्पनाताई लोखंडे, पवनरेख मिश्रा, मनोज निनावे, दत्ता मेश्राम, संजय मेश्राम, देवानंद उराडे, राजेश गोडाने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


या बैठकीत ओबीसीची जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे. मंडल आयोगाची पूर्णतः अंमलबजावणी करण्यात यावी. खाजगीकरणामध्ये आरक्षण लागू करा.या प्रमुख मागण्याच्याकरीता राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राष्ट्रनायक मा. आ. महादेव जानकर साहेब यांच्या नेतृत्वात सोमवार दिनांक 8 ऑगस्ट 2022 ला राजधानी दिल्लीत पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेवर देशव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे.तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या निवडणुकीला राष्ट्रीय समाज पक्षाचा विरोध करण्याकरीता पुढील रणनीती ठरविण्याकरीता या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रासपचे विदर्भ संपर्क प्रमुख कृषी सम्राट राजेंद्र पाटील यांनी केले आहे.