तु मारल्या गत कर आणि मी रडल्या गत करतो" सत्ताधारी आणि विरोधी पक्षीय राज्यकर्त्यांची सोंगाडी राज्यात देशात चालू आहे, जनतेने हे ओळखले पाहिजे. असे रोखठोक विधान आ.महादेव जानकर माजी मंत्री तथा
राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. आपल्या खास शैलीत आणि बोलीत ते व्यक्त होत होते. मा. जानकर म्हणाले, या देशातील व महाराष्ट्र राज्यातला राष्ट्रीय समाज कुठल्या तरी मुद्द्यावरून भडकवायचा आणि विकासापासून वंचित ठेवायच यासाठी सत्ताधारी पक्ष आघाडी आणि विरोधी पक्षाची दोघांची युती झालेली आहे. हे जनतेनं ओळखलं पाहिजे, "तु मारल्या गत कर आणि मी रडल्या गत करतो" अशी या राज्यकर्त्यांची सोंगाडी चालू आहे. "हनुमान चालीसा म्हणा किंवा अजान म्हणा" यातून ना मुसलमानांचा प्रश्न सुटतो, ना हिंदूंचा प्रश्न सुटतो. त्यांचा खेळ चाल्लाय रोज विरोध पक्षाची सभा झाली की, सत्ताधाऱ्यांची सभा अन यामुळं आपल्या समाजाचा वेळ वाया चाल्लाय..
विरोधी आणि सत्ताधारी दोघेही..
१) महागाई च्या मुद्द्यावर गप्प आहेत.
२) वीज बिलावर कोणी बोलत नाही.
३) रस्त्याच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही.
४) मुलांच्या शिक्षणाकडे कोणी लक्ष देत नाही.
५) डिसेल, पेट्रोल च्या दर वाढीवर कोणी बोलत नाही.
६) शासन सर्व सामान्यांसाठी योजना देत नाही.
७) तरूणांना रोजगार उपलब्ध होत नाही.
या दृष्टीने जे चाल्ल पाहिजे होतं त्याच्यावर चर्चा न होता. सोशल मीडियावर हे पत्रकार बांधव 'कुठला नेता काय म्हटला हे दाखवण्यात जास्त रस दाखवतात. दिवसभरात एकच बातमी रिटेक करत होत असते. जनतेला याची 'उब' आलेली आहे. म्हणून जनतेला माझी विनंती आहे की, बांधावर येऊन तुम्ही याचं आत्मचिंतन करावं. ज्याचा त्याचा धर्म आहे, त्याने आपल्या घरात ठेवावा. आम्ही कुठल्याच धर्माबद्दल वाईट नाही. आम्ही तर मानवतावादी आहोत. 'देशात सब समान तो देश महान' हे आम्ही मानगी. ज्याचा त्याचा धर्म आहे त्यानं त्याच्या घरात ज्याच्या ज्याच्या मंदिरात ठेवावा.आणि तुमचं जनतेच लक्ष विकासाच्या मुद्द्यावरून दुर्लक्षित करण्यासाठी हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष करतात, हा राष्ट्रीय समाज पक्षाचा आरोप आहे. म्हणजे विकासाच्या मुद्द्यावरून तुम्हाला भरकवत न्हेणे अन कुठल्या तरी मुद्द्याच्या गोष्टीची चर्चा घडवून आणणं हे योग्य नाही...