२००५ मध्ये एम.बी.एस.उत्तीर्ण होवून कॉलेज मधून बाहेर पडल्यानंतर सन 2006 मध्ये जवाहरलाल नेहरू सावंगी मेघे वर्धा येथे आकस्मिक वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर मनीष मेश्राम यांची नियुक्ती झाली. सन .2007 मद्ये ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले.त्यानंतर सन 2008 तरी 2009 मध्ये पदव्युत्तर पदविका कॉलेज फिजिशियन व सर्जन मुंबई अंतर्गत मसीना हॉस्पिटल भायखळा, मुंबई. येथे मानसोपचार व व्यसनमुक्ती तज्ञाचे प्रशिक्षण घेतले. सन 2009 मध्ये मनोचिकित्सा शासकीय महाविद्यालय नागपूर येथे रुजू झाले. सन 2010 मद्ये मनोचिकस्ता सिद्धार्थ हॉस्पिटल गोरेगाव मुंबई येथे प्रशिक्षण घेतले.सन 2014 ते 2017 ला icu आय.सी.यू . श्वसन विकार विभाग शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नांदेड येथे रुजू झाले. त्यांनी विदर्भातील व महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध रुग्णालयांमध्ये सेवा दिल्यानंतर त्यांचे पाऊल गडचिरोली जिल्हाकडे वळले व याच जिल्ह्यातून त्याच्या वैद्यकीय जीवनाला खरी सुरुवात झाली.डॉ मनिष मेश्राम हे जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे रूजू झाल्यानंतर अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत आहेत.अंगी सेवाभावी वृत्ती जोपासून आपली वाटचाल सुरू केली.सर्व प्रथम जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम,आदिवासी भागातील गरीब, निराधार रुग्णावर अनेक उपचार करून रुग्णांना रोगमुक्त करून जिल्ह्यात स्वतःचे एक विश्व तयार केले. जिल्ह्यातील गरीब, निराधार.अती दुर्गम मागासलेल्या आदिवासी बांधवांना नागपूर सारखे दर्जेदार वैद्यकिय उपचार विनामुल्य मिळावा या उद्देशाने प्रेरित होवून डॉ मनीष मेश्राम यानी आपले संपूर्ण आयुष्य रुग्ण सेवेतच घालविले. गडचिरोली सारख्या अती मागासलेल्या आदिवासी नक्षलग्रस्त जिल्ह्यातील लोकांच्या मनात आरोग्याबाबत जनजागृती व्हावी या महान उदात्त जिज्ञासाने नांदेड़ येथील वैद्यकीय शासकीय महाविद्यालय एम.डी.चेस्ट ला प्रवेश मिळविला व आपल्या अभ्यासू वृत्तिने एम .डी .चे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आदिवासी जिल्हयातील लोकांची मनस्वी सेवा करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील, भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात 2007 मद्ये रुजू झाले. गडचिरोली या दुर्गम वनयुक्त भागातील लोकांनााCancer कॅन्सर या महागड्या व जिवघेण्या आजारावर मोफत विनामुल्य उपचार मिळावा या आत्मीयतेने टाटा कॅन्सर हास्पिटल, मुंबई येथून शिक्षण घेऊन या प्रज्ञावंत डॉक्टरने जिल्ह्यातील हजारों गरीब कॅन्सर ग्रस्त रूग्णावर किमोथेरेपी द्वारे विनामुल्य उपचार करून अनेकांना नव जीवन दिले. कोरोना सारख्या जीवघेण्या संसर्गजन्य आजाराने जिल्हा भयग्रस्त असतांना सुध्दा स्वताची व स्वताच्या कुटूंबाची अजिबात पर्वा न करता स्वतःचे जीव धोक्यात घालून अनेक लोकावर अचूक निदान व उपचार करून अनेकांचे प्राण वाचविले.जिल्ह्यातील प्रत्येक माणसाच्या हृदयात त्यांचे नाव कोरले गेलेले आहे.डॉ मनिष मेश्राम व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या त्यांच्या त्यागमृती पत्नी डॉ मीनाक्षी मेश्राम या दोन्ही डॉक्टर्स दांम्पत्याने कोरोना ग्रस्त रुग्णांची सेवा करतांना, व कोरोना आजाराने स्वतः ग्रस्त असतांना सुध्दा स्वताच्या जीवाचां विचार न करता आपल्या लहानश्या निरागश निर्मळ, दोन मुलाकडे लक्ष्य न देता रोग्यांना योग्य मार्गदर्शन करणे ,रोग्याचे मनोबल वाढविने उपचाराच्या नवीन नवीन पद्धती सांगुन त्यांना जगण्याचे नवनव्या पद्धती सांगीत असत. डॉ मनिष मेश्राम हे सुप्रसिद्ध व नामांकित श्वसनतज्ञ मनोविकार तज्ञ आणी कॅन्सर तज्ञ असतांना सुध्दा त्यांच्या मनाला अहंकार कधीहि शिवलेला नाही.या डॉक्टर्स दाम्पत्याने सामाजिक भावनेतून रोग्याशी व जनतेशी प्रामाणिक व्यवहार करित असताना कधी पैसाचा मोह ठेवला नाही. हेच त्यांचा मोठेपणा समजावा लागेल.डॉ मनिष मेश्राम हे सुप्रसिद्ध , उच्च विध्याभूषित आणि गुणवंत असून सामाजिक बांधिलकी जोपासून, सामाजिक व मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेल्या कार्याची, त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेवून डॉ मेश्राम दाम्पत्यांचा जागतिक आंबेडकर साहित्य मंडळ 18 वा वर्धापन दिन २७ मार्च २०२२रोजी वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम,भंते नागार्जुन सुरई ससाई,डॉक्टर नितीन राऊत,डॉक्टर किशोर गजभिये, गिरीश गांधी, विजय वड्डटीवार अश्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर मनीष मेश्राम यांचा डा बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.