चंद्रपूर: राजकिय आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने ओबीसी असलेली राजकिय पक्ष, सर्व जातींची मंडळे, पतसंस्था, ईतर संस्था, वैयक्तीकरित्या सूचना मागितल्या असून येत्या १० मे २०२२ पर्यंत आयोगाला भेटून अथवा पोस्टाद्वारे पाठवायचे आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांना निवेदन पाठविणे सोयीचे व्हावे यासाठी ८ मे २०२२ ला सायंकाळी ६ वाजता शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ८ मे ला होणाऱ्या बैठकीला सर्व राजकिय पक्षाचे पदाधिकारी, ओबीसीत मोडणाऱ्या जात संघटना, ओबीसी बांधवांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी केली आहे. आयोगाला निवेदन पाठविण्याचा ईमेल आयडी-dcbccmh@gmail.com असून व्हाॅट्सॲप नंबर-9122240622121 यावर पाठविता येणार आहे.