इस्त्रो कडून अवकाशातून पडलेल्या अवशेषांची तपासणीगुढीपाडव्याच्या दिवशी जिल्ह्यात आकाशातून लाल झोत खाली कोसळत लाटबोरी गावालगत काही अवशेष पडले होते.त्या अवशेषांचे तुकडे पवनपार,मेटेपार आसोलामेंढा तलावाजवळ पडलेले नागरीकांना दिसले.त्यांनंतर ते प्रशासनाकडे जमा करण्यात आले.त्या अवशेषांची तपासणी करण्याकरिता estro इस्त्रोची टीम चंद्रपूर जिल्ह्यात
दाखल झाली असून, आज सिंदेवाही येथे पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या अवशेषांची त्यांनी तपासणी सुरू केली आहे.
आठवड्यापूर्वी आकाशातून धुमकेतू सारखे काही अवशेष पडत असल्याचे महाराष्ट्रातील खानदेश, विदर्भातील नागरीकांनी बघीतले. हे अवशेष चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यालगत पडले. प्रशासनाने हे अवशेष पोलीस स्टेशन मध्ये जमा करून या अवशेषांची खातरजमा करण्याकरिता प्रशासनाने इस्रोला संपर्क साधला. प्रशासनाची इस्त्रोनो दखल घेत त्यानुसार आज हे पथक येथे दाखल झाले असून याची तपासणी सुरू केली आहे.