खा.संजय राऊतांवर भाजपाचे मोहीत कंबोज यांचा हल्लाबोल
मुंबई - राणा दाम्पत्यावरून सध्या राज्यात वादंग निर्माण झाले असून शिवसेना नेते राऊत हे आरोपांची फैरी झाडत आहे.
खार येथील फ्लॅट हा राणा दाम्पत्याने डी गॅंग कनेक्शन असलेल्या लकडावाला यांचेकडून घेतला, राणा दाम्पत्याचे अंडरवर्ल्ड सोबत संबंध आहे असा आरोपही राऊत यांनी केला. Sanjay rautसंजय राऊत यांच्या आरोपावर भाजप नेते मोहित कंबोज यांनी हल्लाबोल करीत सर्व आरोप फेटाळून लावले, आरोप करण्यापूर्वी राऊत यांनी पूर्ण माहिती घेऊन आरोप करायला हवे मात्र तसे न करता स्वतः काहीही बरबडायचे असा टोला कंबोज यांनी मारला आहे.

Mohit kamboj bhartiya
युसूफ लकडावाला हे एक बांधकाम व्यवसायी होते, त्यांच्याजवळून रवी राणा यांनी 3 ते 4 वर्षांपूर्वी हा फ्लॅट घेतला होता, युसुफ लकडावाला यांनी तुलना त्यांनी एजाज लकडावाला यांच्याशी केली आहे. Credit & debit
फ्लॅट साठी 80 लाख घेतले की दिले, यावर राऊत गोंधळात आहे, त्यांना क्रेडिट व डेबिट वरील फरक कळत नाही. Mp navneet rana
संजय राऊत सध्या खालच्या पातळीचे राजकारण करून राणा दाम्पत्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप कंबोज यांनी लावला आहे. Mla ravi rana
युसूफ लकडावाला यांचे राजकीय व्यक्तीसोबत अत्यंत चांगले संबंध होते, राजीव गांधी ते शरद पवार अशी अनेक नावे आहे ज्यांच्याशी त्यांचे संबंध होते मात्र हयातीत नसलेल्या लोकांवर राऊत हे खोटे आरोप करीत आहे.
युसूफ लकडावाला यांच्यावर काही वर्षांपूर्वी इओडब्ल्यू कडून गुन्हा दाखल झाला होता परंतु आज ते हयातीत नाही आहेत. हेच संजय राऊत युसूफ लकडावाला यांच्या महाबळेश्वर येथील एवरशाइन हॉटेलमध्ये नाव बदलून तिकडे राहत होते त्यांच्याकडून तेव्हा ते सल्लामसलत घ्यायचे.