विदर्भात २९वे झाडीबोली साहित्य संमेलन मुल तालुक्यातील जुनासुर्ला येथे १२व १३ मार्च २०२२रोजी मोठ्या थाटात पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन मा.ना.श्री. विजय वडेट्टीवार (मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग तथा पालकमंत्री चंद्रपूर) यांच्या हस्ते झाले. संमेलनाचे अध्यक्ष डॉ मनोहर नरांजे हे होते तर प्रमुख पाहुणे झाडीबोली महर्षी डॉ. हरीचंद्र बोरकर, मा. डॉ. हेमकृष्ण कापगते (माजी आमदार),मा. संतोषसिंह रावत अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,मा.डाॅ श्रीराम कावडे, रत्नमालाताई भोयर, घनश्याम येनूरकर, राकेश रत्नावार, राजू मारकवार,विजय कोरेवार, आशाताई देशमुख, सारीका भुमलवार व अनेक मान्यवर उपस्थित होते. 



वास्तविक झाडीबोली साहीत्य काय असते, हे पहील्यांदाच माहीती पडले. जरी मी झाडीपट्टीतील असलो तरीही मला हे माहीती नव्हते. साहीत्य संमेलन जुनासुर्ला येथे होत असल्याचे माहीत होताच मनाला खुप हर्ष झाला. त्यामुळे या कार्यक्रमात आपण आपले साप्ताहिक चंद्रपूर क्रांतीचे विविध साहीत्याने लेखनीय असे विशेषांक काढण्याचे ठरविले. त्यात विविध साहीत्यकांचे लेख, मनोगत, झाडीबोलीची माहीती, कवीता, गजल व इतर अश्या उत्कृष्ट प्रकारचे साहित्य या विशेषांकात छापण्यात आले. त्यामुळे ते विशेषांक माझ्यासाठी खुपच मोठं विशेष होते. या विशेषांकांचे मा.ना. श्री विजयभाऊ वडेट्टीवार (मंत्री इतर मागास बहुजन कल्याण, व पालकमंत्री चंद्रपूर) यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
         
  आयोजक युवा नेतृत्व करीत असलेले गावचे सरपंच रंजीत समर्थ, उपसरपंच खुशाल टेकाम, ग्रामपंचायत सदस्य गणेश खोब्रागडे, लक्ष्मण खोब्रागडे सर यांनी मला या साहीत्य संमेलनात खुप मोठे आदराचे स्थान दिले.व मला कार्यक्रमाच्या आठ टप्प्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले. माझा आदरातिथ्य करून माझा सन्मान ही केला. इतक्या मोठ्या संमेलनात काय बोलायचे आणि काय नाही, या व्दीधा अवस्थेत होतो.छोठ्या मोठ्या कार्यक्रमात बोलणे आणि मोठमोठ्या साहीत्यीकांच्या समोर बोलणे यावेळी खुप अवघडल्यासारखे वाटत होते .तरी सुध्दा मी या साहीत्य संमेलनात एकदाचा बोलता झालो.अनेकांनी शाब्बासकी ची थापही दिली. आयोजकांनी मला मोठं व्यासपिठ मिळवून दिला त्याबद्दल आयोजकांचे मनस्वी आभार!