भवानजीभाई चव्हाण हायस्कुल बनला सायकल चोरी अड्डारामनगर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या भवानजीभाई चव्हाण विद्यालयात विद्यार्थ्यांचे सायकल चोरीला जाणे नित्याचेच झाले आहे.मात्र याकडे पोलीस व विद्यालयाचे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.त्यामुळे भवानजीभाई हायस्कूल सध्या सायकल चोरीसाठी अड्डाच बनला आहे.

भवानजीभाई हायस्कूल मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी ओम गोगुलवार हा रोज सकाळी शाळेत जात असतो.दिनांक ७/३/२०२२ ला ओम गोगुलवार वय १३ वर्षे इय्यता ८ वी मध्ये शिक्षण घेत असून सकाळी सात वाजता भवानजी भाई हायस्कुल, चंद्रपूर मध्ये सायकल घेऊन गेला असता सकाळी ११.०० वाजता शाळा सुटल्यानंतर शाळेच्या आवारात असलेली सायकल दिसुन आली नाही. त्यामुळे शोधा शोध घेतला मात्र सायकल दिसून आली नाही.याबाबत तेथील शिक्षक व मुख्याध्यापक यांनाही माहीती दिली. परंतू सायकल कोणी तरी अज्ञान इसमाने चोरून नेल्याचे लक्षात आले.त्यामुळे दिनांक ११/३/२०२२ रोजी रामनगर पोलीस स्टेशन, चंद्रपूर येथे लेखी रिपोर्ट देवून ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर सायकल शाळेच्या आवारातून गेलेली असल्यामुळे शाळेचे संस्थापक अध्यक्ष, मुख्याध्यापक व शिक्षक हे जबाबदार असुन शाळेतील मुलांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप पालकांनी केली आहे. या अगोदरही अशा प्रकारे भरपूर सायकल चोरी गेलेल्या आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भवानजीभाई हायस्कुल, चंद्रपूर मध्ये शिकवायचे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकाचे शाळेच्या प्रशासना विरोधात रोष निर्माण झाला आहे.