देश्याच्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विज निर्मिती केंद्रात काल रात्री १०.३० वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघाने कामावरून परत घराकडे जात असताना
भोजराज मेश्राम वय ५९असे ते वैद्यनगर तुकुम यांचा मृत्यू झाला.सिटीपीएस मधील कुणाल कंपनीत काम करीत होते.युनिट क्र ८व ९ मधील बेल्टचा काम करीत असल्याची माहिती आहे.काल रात्री आपले काम करून घराकडे जात असतांना आत मधील रस्त्यावरच दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.त्याना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष बंडू भाऊ हजारे , जिल्हा कार्याध्यक्ष कैलाश तेलतुबडे, जिल्हा सचिव अमोल मेश्राम यांच्या प्रयन्ताने त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे
सिटीपीएसचा गलथान कारभार!
सिटीपीएसमध्ये आतमध्ये जाण्यासाठी कुणालाही परवानगी नाही.आत मध्ये जाण्यासाठी सिआयएसएफची मंजूरी घ्यावे लागते मात्र सिटीपीएसचे अधिकारी आमदार व इतर राजकारण्यांना आत जाण्यासाठी राजरोसपणे सुट दिल्या जाते.वाघांचे आत मध्ये अनेकदा वावर असल्याचे दिसून आले आहे.मात्र वनविभाग व सिटीपिएसचे अधिकारी मुग गिळून गप्प बसले आहेत.सिटीपीएस मध्ये इतक्या घटना घडत असताना सुध्दा अधिकारी झोपेचे सोंग घेऊन आहेत.त्याच्या या गलथान कारभारामुळेच मेश्राम यांचा नाहक जिव गेला हे विशेष, या घटनेमुळे त्यांच्या परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.त्यामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष बंडू भाऊ हजारे , जिल्हा कार्याध्यक्ष कैलाश तेलतुबडे, जिल्हा सचिव अमोल मेश्राम यांच्या संघटनेच्या नेतृत्वात मोबदला म्हणुन ५,००००० / रू (पाच लाख रूपये) ,कुणाल इंटर प्रायजेस कंपनी कडून २,५०,०००/चेक व ५०,००० नगदी परिवारातील एका सदस्याला कंत्राटी कामगार म्हणून कंपनी मध्ये काम, मृत्काच्या पत्नीला पेन्शन, अंतिम संस्कार साठी वनविभाग कडून २०,०००/ रू तसेच १५,०००००/ रू ची आर्थिक मदत करण्यात आली .