पोलीस अधीक्षक व वन अधिकारी यांच्या मध्यस्थीने नितीन भटारकर यांच्या उपोषणाची सांगता



चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात वाघ आणि बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा जीव गेल्यानंतर येथे आक्रोश सुरू आहे दरम्यान वन विभागाच्या विरोधात नितीन भटारकर यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. आज मंगळवार दि.22 फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व वनविभागाचे अधिकारी काळे यांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता झाली.


वन विभागाच्या ढिसाळ, नियोजनशुन्य कारभाराच्या निषेधार्थ नितीन भटारकर यांनी दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ अन्यत्याग आंदोलनाला सुरुवात केली.

या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. विजय वडेट्टीवार साहेब यांनी भेट दिली होती. त्यानंतर रात्री एका वाघाला जेरबंद करण्यात आले. तसेच दुर्गापूर आणि उर्जांनगर बंद पाळण्यात आला. त्यानंतर पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. वनविभाग अधिकारी काळे यांनी मागण्याची पूर्तता करण्याचे आश्वासन देणारे पत्र विभागाचे अधिकारी काळे यांनी नितीन भटारकर यांना दिले.