वाघाचे बंदोबस्त करण्यासाठी उर्जामंत्र्यांना निवेदन महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री श्री नितीन जी राऊत हे चंद्रपूर दौऱ्या वर आले असता चंद्रपूर थर्मल पाॅवर स्टेशन उर्जानगर मध्ये दिनांक १६-२-२०२२ रोजी ctps येथील कुणाल इंटरप्राईसेस चे कंत्राटी कामगार भोजराज मेश्राम याच्या वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला या संदर्भात युवासेना विस्तराक चंद्रपूर जिल्हा नित्यानंद त्रिपाठी जी सर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना उप जिल्हाप्रमुख कैलाश भाऊ तेलतुंबडे यांच्या नेतृत्वात मंत्री महोदय साहेबांची चर्चा केली व प्लांट अंतर्गत असलेल्या वाघांचा तातडीने बंदोबस्त करा अशी निवेदन देऊन मांगणी केली तेव्हा आज झालेल्या हिराई विश्रामगृह येथील बैठकीत लवकरच वाघांना जेरबंद करण्यात येईल अशी ग्वाही मंत्री महोदयांनी दिली या वेळी युवासेना विधानसभा समनव्यक अमोल मेश्राम कंत्राटी कामगार सेना युनिट अध्यक्ष प्रफुल सागोरे तसेच सचिव प्रमोद कोल्हारकर यांची उपस्थिती होती.