नक्षलवाद्यांनी जाळले वाहने



गडचिरोली :- जिल्हयातील भामरागड तालुका मुख्यालयापासून १४ कि.मी.अंतरावरील इरपनार गावात आज (२१) दुपारी २ वाजताचे सुमारास नक्षल्यांनी १५ ट्रक्टर,दोन जेसीबी व एक ग्रेडर वाहन जाळली.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत धोडराज ते इरपनार या गावापासूनचे ४ कि.मी.रस्त्याचे काम कंत्राटदारामार्फत सुरु होते.जवळपास २२ ते २५वाहने सदर कामावर होती.काही कंत्राटदाराचे वाहने तर काही स्थानिक परीसरातील लोकांची वाहने होती. अगदी गावालगत खड्डा खोदून माती काढण्याचे काम सुरू होते.अंदाजे २ ते २.३० वाजताचे दरम्यान ४० ते ५०च्या संख्येने असलेल्या नक्षल्यांनी खड्याच्या सभोवार झाले.१० ते १५ बंदुकधारी पुढे येऊन वाहनांना आग लावली.त्यानंतर लगेच लाल रंगाचा बॅनर लावून निघून गेले.त्या बॅनर वर सुरजागड प्रकल्प बंद झाला पाहिजे व मोदी सरकारच्या विरोध दर्शविणारे विचाराचे बॅनर वाहने जाळल्याचे ठिकाणी व गावाच्या वेशीवर बांधले होते.