ऑनलाईन शिक्षणापेक्षा शाळेत जाण्याकडे ग्रामीण विद्यार्थ्यांना रस !
मागील तीन वर्षापासून कोरोनाच्या भीतीमुळे शासनाने ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू केले होती, प्रत्येक विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती आणि आर्थिक स्थिती आँनलाईन शिक्षण घेण्याची नाही. आता पुन्हा कोरोना काळात शाळा बंद होण्याचे चिन्ह दिसत आहे, शासनाने शाळा सुरूच ठेवाव्या, अशी मागणी ग्रामीण भागात होत आहे.
चंद्रपूर : कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसादिवसें वाढ होत असल्याने विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष स्वरूपात शाळांमध्ये जाणे अडचणीत आले आहे. विद्यार्थ्यांना ऑफलाइन शाळांमध्ये पाठवावे की नाही, याबाबत पालकांच्या मनात पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे.
डिसेंबरमध्ये अनेक शाळांना प्रत्यक्ष स्वरूपात प्रारंभ झाला होता. विद्यार्थीही चांगल्या संख्येने शाळेत जाऊ लागले आहेत. दरम्यानच्या काळात अनेक शाळांना ख्रिसमसच्या सुट्या लागल्या होत्या. आता, नवीन वर्षात शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र, ओमायक्रॉनची धास्ती आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
ग्रामीण भागातील मुले साधारणतः सामान्य कुटुंबातील आहेत त्यातही सामान्य कुटुंबातील पाल्याकडे ऑडराईड मोबाईल फोन नसते त्यामुळे आपल्या पाल्याचे ऑनलाईन शिक्षणासाठी त्रासदायक आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची संख्या ग्रामीण भागात जास्त आहे. त्यामुळे मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी खोळंबा निर्माण होते.शाळा सुरु करण्यापूर्वी शाळेत पाठवित असल्याबाबत चे संमतीपत्र पालकांकडून लिहून घेण्यात आले होते. पालकांनी ही ऑफलाईन शाळेला भरभरून प्रतिसाद दिला होता. मात्र सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकार विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेत आहे. शहरी भागात शाळेत पाठविण्यापेक्षा पालक ऑनलाइनला पसंती देत आहेत. मात्र ग्रामीण भागातील पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी चिंतेचे वातावरण निर्माण झाले.ऑनलाईनसाठी विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन असणे आवश्यक आहे.यात गरीब आणि होतकरू मुलांच्या शिक्षणात खंड निर्माण होणार असून हुशार विद्यार्थ्यांची गळचेपी होणार आहे.त्यामुळे शासनानी या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करुन विद्यार्थ्यांचे ऑफलाईन शिक्षणाचा निर्णय घ्यावा असे ग्रामीण भागातील पालकांकडून केल्या जात आहे.